आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलकाताने पंजाबला 2 धावांनी हरवले:किंग्स इलेव्हन पंजाबचा या सत्रात सलग 5 वा पराभव, केकेआर विजयासह टॉप-3 मध्ये; प्रसिद्ध कृष्णा आणि सुनील नरेन ठरले हिरो

अबुधाबी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 मोसमातील 24 व्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 2 धावांनी पराभव केला. अबुधाबीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 165 धावांचे आव्हान केले होते. पंजाबला मात्र 5 गडी बाद 162 धावांपर्यंत मजल मारता आली.

17 व्या ओव्हरपर्यंत सामना पंजाबच्या पारड्यात होता. मात्र 18 व्या षटकात सुनील नरेनने फक्त 2 धावा दिल्या आणि निकोलस पूरनला बाद केले. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाने लोकेश राहुल (74) बाद करत पंजाबकडून विजय हिसकावला. सामना टाय करण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती. मात्र ग्लेन मॅक्सवेल केवळ 4 धावा करू शकला.

केकेआरच्या सुनील नरेनने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देत 2 गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 3 गडी बाद केले. या विजयासोबत केकेआर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली.

पंजाबसाठी 115 धावांची सलामीची भागीदारी

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल (56) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी झाली. ही दोघांमध्ये या सत्रातील दुसरी शतकी भागीदारी आहे. याआधी दोघांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध 183 धावांची सलामीची भागीदारी केली होती. यावर्षी मोसमात पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 4 वेळा शतकीय भागीदारी झाली आहे.

सीझनमध्ये चौथ्यांदा राहुल-मयंक पावर-प्लेमध्ये नाबाद राहिले

राहुल आणि मयंयने पावर-प्लेमध्ये 47 धावा केल्या. या सीझनमध्ये दोघेही चौथ्यांदा पावर-प्लेमध्ये नाबाद राहिले. याआधी दोघांनी बंगळुरू विरुद्ध 50, राजस्थानविरुद्ध 60 आणि चेन्नईविरुद्ध 46 धावा केल्या होत्या.

लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

पावर-प्लेमध्ये दुसरी सर्वाधिक कमी स्कोअर

कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. मागील सामन्यातील हिरो राहुल त्रिपाठी या सामन्यात केवळ 4 धावा काढू शकला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. यानंतर नितीश राणा 2 धावा काढून तंबूत परतला. केकेआरने सुरुवातीच्या 6 षटकांत 2 गडी बाद 25 धावा केल्या. पावर-प्लेमध्ये हा या सत्रातील दुसरी कमी स्कोअर आहे.

याआधी दिल्ली कॅपिटल्सने पंजाब विरुद्ध दुबईत 3 गडी बाद 23 धावा केल्या होता. तर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध अबुधाबीत 3 गड्याच्या मोबदल्यात 31 धावा केल्या होत्या.

शमीने आयपीएलमध्ये 50 विकेट पूर्ण केल्या

राहुल त्रिपाठीला बाद केल्यानंतर पंजाबचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या 50 विकेट पूर्ण केल्या. शमीने 58 सामन्यांत 56 डावात ही कामगिरी केली. या सत्रात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत शमी टॉप-5 मध्ये आहे.

मॉर्गनने आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या

केकेआरचा मधल्या फळीतील फलंदाज इयोन मॉर्गनने आयपीएलमधील आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. मॉर्गनने 58 सामन्यांत 51 डावांत 1021 धावा काढल्या. मॉर्गनने आयपीएलमध्ये 23 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचा बेस्ट स्कोअर 66 धावा आहे.

दोन्ही संघामध्ये खेळण्यात आलेल्या मागील 5 सामन्यांची तुलना केल्यास पंजाबने केवळ 2 वेळेस केकेआरला पराभूत केले आहे.

दोन्ही संघात एक-एक बदल

कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने संघात एक बदल केला आहे. शिवम मावीच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णा खेळणार आहे. पंजाब संघातही शेल्डन कॉटरेलच्या जागेवर क्रिस जॉर्डन खेळणार आहे.

दोन्ही संघ

पंजाब : लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मुजीब-उर-रहमान, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह

कोलकाता : शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नीतीश राणा, सुनील नरेन, आंद्रे रसेल, इयोन मोर्गन, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टिरक्षक), पॅट कमिंस, प्रसिद्ध कृष्णा, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती।

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser