आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:पंजाब सलग विजयाच्या षटकारासाठी सज्ज; राजस्थान टीमला शेवटची संधी

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलग पाच सामने जिंकून जबरदस्त फाॅर्मात असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आता लीगमध्ये विजयाचा षटकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे. यातून पंजाबला सलग सहाव्या विजयाची संधी आहे. लाेकेश राहुलचा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि स्मिथचा राजस्थान राॅयल्स संघ आज शुक्रवारी समाेरासमाेर असतील. राजस्थान संघाला आता प्ले आॅफच्या शर्यतीमधील आपले आव्हान कायम ठेवण्याची शेवटची संधी आहे. दुसरीकडे सलगच्या पाच विजयांनंतर आता पंजाब संघाला प्ले आॅफ प्रवेशाचा आपला दावा मजबूत करण्याची संधी आहे. त्यामुळे आता हा सामना अधिक रंगतदार हाेईल.

सातपैकी सहा सामन्यांतील पराभवानंतर पंजाब संघाने दमदार पुनरागमन केले आहे. पंजाब संघ आता लीगमध्ये फाॅर्मात आला आहे. खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्यामुळे पंजाब संघाला आता या सामन्यात विजयाचा काैल मिळत आहे. पंजाबची नजर सलग सहाव्या विजयाकडे लागली आहे. आेव्हरआॅल पाहिल्यास राजस्थान राॅयल्स टीमचे पारडे जड मानले जाते. कारण, टीमने आतापर्यंत पंजाबविरुद्ध झालेल्या २० पैकी ११ सामन्यांत विजयाची नाेंद केली.