आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:होल्डरच्या गोलंदाजीसमोर राजस्थान भुईसपाट,मनीषचा झंझावात; आठ उत्तुंग षटकारांसह नाबाद 83 धावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच

सामनावीर युवा फलंदाज मनीष पांडे (८३) आणि व्ही. शंकर (५२) यांच्या अभेद्य शतकी भागीदारीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये विजयाचा चाैकार मारला. हैदराबाद संघाने गुरुवारी लीगमधील आपल्या दहाव्या सामन्यात स्मिथच्या राजस्थान राॅयल्सला पराभूत केले. डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने १८.१ षटकांत आठ गड्यांनी विजयाची नाेेंद केली. दुसरीकडे राजस्थान राॅयल्स संघाला सातव्या पराभवाचा सामना करावा लागला.

हैदराबादच्या गाेलंदाज जेसन हाेल्डरच्या भेदक माऱ्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान राॅयल्स संघाला २० षटकांत पाच बाद १५४ धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाचा कर्णधार वाॅर्नर (४) आणि जाॅनी बैयरस्ट्राे (१०) हे दाेघेही झटपट बाद झाले. मात्र, त्यानंतर मनीष आणि व्ही.शंकरने राजस्थानची सुमार गाेलंदाजी फाेडून काढताना अभेद्य विजयी भागीदारी केली.

सनरायझर्स हैदराबादसाठी सीझनमधील पहिला सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरने राजस्थानच्या फलंदाजांना कोणीतही संधी दिली नाही. होल्डरने 3 फलंदाजांना बाद केले.
सनरायझर्स हैदराबादसाठी सीझनमधील पहिला सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरने राजस्थानच्या फलंदाजांना कोणीतही संधी दिली नाही. होल्डरने 3 फलंदाजांना बाद केले.
राजस्थानचा फलंदाज संजू सॅमसनने संघासाठी सर्वात जास्त 36 धावा काढल्या.
राजस्थानचा फलंदाज संजू सॅमसनने संघासाठी सर्वात जास्त 36 धावा काढल्या.
राशिद खानने स्टोक्सला बाद करून राजस्थानला तिसरा झटका दिला.
राशिद खानने स्टोक्सला बाद करून राजस्थानला तिसरा झटका दिला.
बेन स्टोक्सने 32 बॉलवर 30 धावा काढल्या.
बेन स्टोक्सने 32 बॉलवर 30 धावा काढल्या.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर रियाण परागचा झेल पकडताना.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर रियाण परागचा झेल पकडताना.
हैदराबादचा ओपनर जॉनी बेयरस्टोला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले.
हैदराबादचा ओपनर जॉनी बेयरस्टोला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले.
विजय शंकरने 6 चौकरांच्या मदतीने नाबाद 52 धावा काढल्या.
विजय शंकरने 6 चौकरांच्या मदतीने नाबाद 52 धावा काढल्या.
मनीष पांडे आणि विजय शंकर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची नाबाद भागीदारी केली.
मनीष पांडे आणि विजय शंकर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची नाबाद भागीदारी केली.