आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:दिल्ली पहिल्यांदा फायनलमध्ये; उद्या मुंबईचे आव्हान, हैदराबादचे किताबाचे स्वप्न भंगले

अबु धाबी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कागिसाे रबाडा (४/२९) व सामनावीर स्टाेइनिसने (३/२६) धारदार गाेलंदाजीच्या बळावर रविवारी दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या आयपीएलमधील फायनल गाठून दिली. गाेलंदाजीच्या आधारे दिल्ली संघाने एलिमिनेटर सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या २०१६ च्या विजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केले. दिल्ली संघाने १७ धावांनी सामना जिंकून अंतिम फेरीचा पल्ला गाठला. यासह श्रेयस अय्यरच्या कुशल नेतृत्वात दिल्लीच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला आहे. शिखर धवन (७८) आणि हेटमेयरच्या (४२) झंझावाती फलंदाजीच्या बळावर दिल्ली संघाने तीन गड्यांच्या माेबदल्यात हैदराबादसमाेर विजयासाठी १९० धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैदराबादने ८ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली. पराभवाने विलियम्सनची (६७) एकाकी झुंज व्यर्थ ठरली.

उद्या गत चॅम्पियन मुंबईशी झंुजणार : पहिल्यांदाच फायनल गाठल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आता याच माेठ्या खेळीच्या बळावर किताबाचा बहुमान पटकावण्याच्या इराद्याने दिल्लीचे खेळाडू मंगळवारी मैदानावर उतरणार आहेत. मात्र,यासाठी दिल्लीला फायनलमध्ये गत चॅम्पियन आणि चार वेळच्या किताब विजेत्या मुंबई इंडियन्स संघाच्या आव्हानाला सामाेरे जावे लागणार आहे.