आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2020
  • MI VS DC: Qualifier 1 Live Score Mumbai Indians Vs Delhi Capitals Latest Cricket Updates | Indian Premier League Latest Cricket Updates, IPL Today Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई इंडियंस फायनलमध्ये दाखल:मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय; जसप्रीत बुमराहने घेतल्या 4 विकेट

दुबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील पहिला क्वालिफायर मुंबई इंडियंस (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) दरम्यान दुबईमध्ये झाला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 57 धावांनी मात केली आहे. या विजयासह मुंबई अंतिम लढतीत दाखलझाली आहे. दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीला 201 धावांचे लक्ष्य दिले होते. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

बुमराहने 4 विकेट घेतल्या

मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 मोठ्या विकेट घेऊन दिल्लीला मोठे धक्के दिले. बुमराने शिखर धवन, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोइनिस आणि डेनियल सॅम्सला आउट केले.

दिल्लीची खराब सुरुवात झाली. झिरो रनांवर 3 विकेट गेल्या. ट्रेंट बोल्टने पहिल्या ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला आउट केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. यानंतर बुमराने कर्णधार अय्यरला आउट केले.

मुंबईने 5 गमावून 200 रन केले

मुंबईकडून सुर्यकुमारने 38 बॉलमध्ये 51 , इशान किशनने 30 बॉलवर नाबाद 55 , क्विंटन डिकॉकने 25 बॉलवर 40 आणि हार्दिक पांड्याने 14 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. दिल्लीकडून रविचंद्रन अश्विनने 29 रन देऊन 3 विकेट घेतल्या. त्याननंतर एनरिच नोर्तजे आणि मार्कस स्टोइनिसने 1-1 विकेट घेतल्या.

अश्विनने मुंबईला तीन मोठे धक्के दिले

रविचंद्रन अश्विनने मुंबईच्या कर्णधार रोहित शर्मा आणि कीरोन पोलार्डला शून्यावर माघारी पाठवले. रोहित एलबीडब्ल्यू तर, पोलार्डची कॅच कगिसो रबाडाने घेतली. यानंतर अश्विनने क्विंटन डिकॉक (40) ला शिखर धवनकडे झेलबाद केले. दुसरीकडे सुर्यकुमारची विकेट एनरिच नोर्तजे घेतली.

दिल्लीचा कर्णधार कप्तान श्रेयस अय्यरने प्लेइंग इलेवनमध्ये कोणताच बदल केलाला नाही. तर, मुंबईमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. जेम्स पॅटिंसन, धवल कुलकर्णी आणि सौरभ तिवारीला बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्याला संधी देण्यात आली आहे.

या सामन्यात जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेस करेल आणि पराभव झालेल्या संघाला अजून एक संधी मिळेल. दिल्लीने अजून एकदाही फायनल खेळलेला नाही. त्यामुळे यावेळेस दिल्लीकडे फायनलमध्ये जाण्याची चांगली संधी आहे.

दोन्ही संघातील परदेशी खेळाडू

मुंबईच्या प्लेइंग इलेवनमध्ये क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड, नाथन कुल्टर-नाइल आणि ट्रेंट बोल्ट आहेत. तर, दिल्लीमध्ये मार्कस स्टोइनिस, डेनियल सैम्स, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे आहेत.

दोन्ही संघ

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, नाथन कुल्टर-नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, डेनियल सैम्स, अक्षर पटेल, रविंचद्रन अश्विन, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.

पराभव झालेल्या संघाचा एलिमीनेटरच्या विजेत्याशी सामना होईल

क्वालिफायर-1 मध्ये पराभव झालेल्या संघाचा 6 नोव्हेंबरला होणाऱ्या एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत सामना होईल. त्या सामन्यातील विजेता संघ अंतिम सान्यात क्वालिफाय-1 मधील विजेत्याशी टक्कर घेईल. एलिमिनेटर अबुधाबीमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदरम्यान होईल.