आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये आज:मुंबईला विजयी षटकाराची संधी; आज केकेआरशी झुंज

दुबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई इंडियन्सकडे शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा सत्रात अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी आहे. अबुधाबीच्या शेख जाहेद स्टेडियममध्ये त्याचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होईल. सध्या मुंबई गुणतालिकेत दिल्लीनंतर दुसऱ्या स्थानी आहे. कोलकातावरील विजय त्यांना पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचवू शकतो.

मुंबईचे सध्या सर्वकाही सुरळीत सुरू आहे. कोणताही खेळाडू जखमी नाही, कोणत्याही खेळाडूंच्या फॉर्मची चिंता नाही. सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक व रोहित शर्माने संथ सुरुवात केली. मात्र, त्यांनी शानदार लय मिळवली. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव व ईशान किशन चांगल्या लयीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...