आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोशल मीडियाचे अँटी सोशल:धोनीच्या अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीला बलात्काराची धमकी, सोशल मीडियाच्या गैरवापराचा कळस

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीवर नाराज चाहत्यांनी सोशल मीडियावर सर्व सीमा पार केल्या. टीकाकारांनी धोनीची पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची 5 वर्षाची मुलगी जीवाचा बलात्कार करण्याची धकमी दिली. अभिनेत्री नगमा यांनी याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की देशात काय घडत आहे?

नगमाने ट्विट केलेकी, "एक देश म्हणून आपण कोठे उभे आहोत? आयपीएलमध्ये केकेआरकडून चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करण्याची लोकांनी धमकी दिली ही अंत्यत लाजिरवाणी गोष्ट आहे. मिस्टर पंतप्रधान आपल्या देशात हे काय घडत आहे?" यावेळी नगमाने हॅशटॅगमध्ये बेटी बचाओ - बेटी पढाओ देखील लिहिले.

खासदार प्रियंका आणि आमदार सौम्या यांनीही नाराजी व्यक्त केली

कर्नाटकच्या आमदार सौम्या रेड्डी यांनी म्हटले की, "हे अंत्यत दुःख आहे. आपल्या देशात काय सुरू आहे? आपण कोणत्या दिशेने जात आहोत." तर महाराष्ट्रात शिवसेनेतच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिले की, आज सोशल मीडियाचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे. हे त्याचे मोठे उदाहरण आहे.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात धोनीने 12 चेंडूत 11 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये बुधवारी कोलकाता नाइट राइडर्सने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र सीएसकेला 157 धावा करता आल्या. या सामन्यात सीएसकेचा 10 धावांनी पराभव झाला होता.

या सामन्यात धोनीने 12 चेंडूत केवळ 11 धावा केल्या होत्या. चेन्नईने या मोसमात आतापर्यंत 6 पैकी 2 सामने जिंकून 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. ावर्षी कोरोनामुळे धोनी आपल्या कुटुंबीयांना आयपीएलसाठी युएईला घेऊन गेला नाही.