आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2020
  • MS Dhoni; IPL UAE 2020 News Update | Mahendra Singh Dhoni Whistle Training To Chennai Super Kings (CSK) Player Deepak Chahar Kings XI Punjab Team Pool Volleyball

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल मस्ती:धोनीने दीपक चाहरला शिकवले शिट्टी कशी वाजवायची! माहीला फॅन्स म्हणाले, रैनाला सुद्धा असेच करून टीममध्ये परत बोलवा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीलची सुरुवात होण्यापूर्वी सराव करण्यासोबतच खेळाडूंनी मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत. त्यापैकीच एका प्रसंगी सीएसके अर्थातच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी शिट्टी वाजवताना दिसून आला. तो आपला सहकारी दीपक चाहरला शिट्टी वाजवणे शिकवत होता. यावेळी दोघांनी मिळून शिट्टी कशी वाजवायची याची प्रॅक्टिस केली. कोरोनामुळे यंदाचा आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत खेळला जाणार आहे. यात पहिला सामना चेन्नई आणि मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे.

रैनाला सुद्धा असेच करून टीममध्ये परत बोलवा

दीपक चाहरला शिट्टी वाजवण्यास शिकवताना धोनीचा व्हिडिओ सीएसकेने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. त्यावर धोनीच्या आणि सीएसकेच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यातील काहींनी तर सुरेश रैनाला असेच करून टीममध्ये परत बोलवून घ्या अशी विनंती केली.

ऋतुराज गायकवाडची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह

सीएसके टीममध्ये दीपक चाहर आणि ऋतुराजसह 13 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उप-कर्णधार सुरेश रैना आयपीएल सोडून घरी निघून गेला होता. त्यानंतर आता या खेळाडूंची तिसरी चाचणी घेण्यात आली. यात ऋतुराज वगळता सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

किंग्स एलेव्हन पंजाबने सुद्धा आपल्या टीमचा स्वीमिंग पूलमध्ये व्हॉलिबॉल खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये मोहंमद शमीसह अनेक खेळाडू दिसून आले आहेत.