आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल:सर्वच संघांविरुद्ध 50% सामने जिंकणारी मुंबई इंडियन्स एकमेव टीम

दुबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलगच्या विजयाच्या बळावर मुंबईने गुणतालिकेतील अव्वल स्थानही गाठले

गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने आपली विजयी माेहीम कायम ठेवताना यंदाच्या लीगमध्ये आपला किताबाचा दावा मजबूत केला आहे. सलगच्या विजयाच्या बळावर मुंबईने गुणतालिकेतील अव्वलस्थानही गाठले आहे. यादरम्यान सामन्यागणिक उल्लेखनीय कामगिरी करताना मुंबई इंडियन्स संघाने आपल्या रेकाॅर्डमध्येही माेठी सुधारणा केली आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झालेल्या सर्वच संघांविरुद्ध ५० टक्के सामने जिंकणारा एकमेव संघ ठरला आहे.

या संघाने रविवारी सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. यासह मुंबई संघाने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले. मुंबईने सर्वाधिक सामने काेलकाता टीमविरुद्ध जिंकलेले आहेत. टीमचा कर्णधार राेहित शर्माही सध्या जबरदस्त फाॅर्मात आहे. त्यामुळे आता त्याच्या कुशल नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा लीगची ट्राॅफी वर उंचावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच दिशेने सध्या मुंबईचा संघ आगेकूच करत आहे.

कागिसाे रबाडाच्या सलग 25 सामन्यांमध्ये विकेट
दिल्ली कॅपिटल्स संघापाठाेपाठ वेगवान गाेलंदाज कागिसाे रबाडाही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना दिसताे. यातूनच त्याने पर्पल कॅपवरील आपले आव्हान कायम ठेवले आहे. ताे सध्या सर्वाधिक १७ बळींसह अव्वल स्थानावर आहे. त्याने यातूनच आता २५ सामन्यांत सलग विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला. या विक्रमामध्ये आता त्याने लसिथ मलिंगालाही मागे टाकले आहे.

सामन्या गणिक ७ रनची बचत करते मुंबई टीम
मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी, गाेलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांतील कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. त्यामुळेच या संघाला आतापर्यंत सामन्यागणिक ७ धावांची बचत करता आली. दुसरीकडे सुमार क्षेत्ररक्षणामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रत्येक सामन्यात माेठा फटका बसला. या संघाने ७ अवांतर धावा दिल्या आहेत.