आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 27वा सामना मुंबई इंडियंस आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान अबुधाबीमध्ये होत आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य दिले आहे. मुंबईने 19.4 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठले. यासोबतच मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचली आहे. मुंबईकडून क्विंटन डिकॉक आणि सुर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक केले. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
अय्यर - धवनची 85 रनांची पार्टनरशिप
दिल्लीकडून शिखरने सर्वाधिक 69 धावा केल्या, तर 100 षटकार पूर्ण केले. त्यानंतर श्रेयस अय्यरने 42 रन काढले. अय्यरला क्रुणाल पांड्याने आउट केले. अय्यरने धवनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 85 रनांची पार्टनरशिप केली. या सीजनचा पहिला सामना खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने 15 रन काढले. त्यालाही क्रुणाल पाँड्याने आउट केले. तसेच, पृथ्वी शॉ 4 रनांवर आउट झाला.
मुंबईकडे हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची संधी आहे. सध्या दिल्ली टॉपवर आहे. दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माकडे लीगमध्ये 39 फिफ्टी मारणारा खेळाडू बनण्याची संधी आहे. या सामन्यान अर्धशतक मारुन रोहित विराट आणि रैनाला मागे सोडेल.
दोन्ही संघ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.