आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI vs KXIP:डबल सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा रोमांचक विजय; IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा सुपर ओव्हरदेखील टाय, मुंबईने दिलेले 12 रनांचे टार्गेट पंजाबने 4 बॉलमध्ये चेज केले

दुबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 36 व्या सामन्यात किंग्स इलेवन पंजाब (KXIP) ने मुंबई इंडियंस (MI) ला डबल सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. यापूर्वीच्या सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पंजाबला 12 रनांचे टार्गेट दिले होते, पंजाबने 4 बॉलमध्येच हे टार्गेट चेज केले. पंजाबसाठी क्रिस जॉर्डन आणि मुंबईसाठी ट्रेंट बोल्टने दुसरी सुपर ओव्हर टाकली. आईपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा एका दिवसात तीन सुपर ओव्हर सामने झाले. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

मुंबईने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत आणि पंजाबला 177 रनांचे टार्गेट दिले होते. पंजाबने बरोबरी करुन सामना टाय केला. पंजाबकडून कर्णधार राहुल ने सर्वाधिक 77 धावा केल्या.

पंजाबची संथ सुरुवात

लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजबची संथ सुरुवात झाली. टीमकडून 33 रनांवर मयंक अग्रवाल (11) ची विकेट गेली. यानंतर क्रिस गेलने 21 बॉलवर 24 रन केले. याशिवाय निकोलस पूरनने 12 बॉलवर 24 रन केले.

क्विंटन डि कॉकने आयपीएलमध्ये 14 वे आणि या सीजनमध्ये चौथे अर्थशतक लगावले. ओपनर क्विंटन डिकॉकने मुंबईकडून सर्वाधिक 53 धावा केल्या. पंजाबसाठी मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंहने 2-2 विकेट्स घेतल्या.

डिकॉकचे मुंबईसाठी हे सलग तिसरे अर्धशतक आहे. हा कारनामा करणारा डिकॉक सचिन तेंडुलकरनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिनने 2010 मध्ये मुंबईसाठी खेळताना सलग तीन अर्धशतके केली होती. यापूर्वी डिकॉकने कोलकाताविरुद्ध 78 आणि दिल्लीविरुद्ध 53 धावा केल्या होत्या.

मुंबईची खराब सुरुवात

मुंबईने पावर-प्ले मध्ये 38 रन काढून 3 विकेट्स गमावल्या. ओपनर डिकॉक एका बाजूने संघाला सावरत होता आणि त्याने क्रुणाल पांड्या (34)सोबत 58 रनांची पार्टनरशिप केली. यानंतर अखेर 12-12 बॉलवर कीरोन पोलार्डने 34 आणि नाथन कुल्टर-नाइलने 24 रनांची सर्वात वेगवान खेळी केली. दोघांमध्ये 7 व्या विकेटसाठी 21 बॉलवर 57 रनांची पार्टनरशिप झाली.

दोन्ही संघ

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, नाथन कुल्टर-नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.

बातम्या आणखी आहेत...