आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MI vs SRH:हैदराबादचा मुंबईवर दणदणीत विजय; सनरायजर्स प्ले-ऑफमध्ये दाखल, कोलकाता टुर्नामेंटमधून बाहेर

शारजाहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेविड वॉर्नर(85) आणि ऋद्धिमान साहा(58)ची अर्धशतकी खेळी

IPL च्या 13 व्या सत्रातील 56वा सामना मुंबई इंडियंस आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान शारजाहमध्ये झाला. या सामन्यात हैदराबादने मुंबईवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. लीग राउंडच्या अखेरच्या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने हैदराबादला 150 धावांचे लक्ष्य दिले होत. प्रत्युत्तरात हैदराबादच्या सलामीवीर जोडी डेविड वॉर्नर(85) आणि ऋद्धिमान साहा(58)ने 17.1 ओव्हरमध्ये सामना आपल्या खिशात घातला. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

मुंबईकडून कीरोन पोलार्डने सर्वाधिक 41 रन केले. यानंतर सुर्यकुमार यादवने 36 आणि ईशान किशनने 33 धावा केल्या. तर, हैदराबादच्या संदीप शर्माने 3, शाहबाज नदीम आणि जेसन होल्डरे 2-2 आणि राशिद खानने 1 विकेट घेतली.

दोन्ही ओपनर्स लवकर आउट

मुंबईची खराब सुरुवात झाली. पहिल्या 5 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक आउट झाले. रोहितने फक्त 4 रन काढले, तर डिकॉक 25 रन काढून आउट झाला. दोन्ही विकेट संदीप शर्माने घेतल्या.

प्ले-ऑफमध्ये हैदराबादला स्थान

या सामन्यातील विजयासह हैदराबादचे प्ले-ऑफमधील स्थान पक्के झाले आहे. तर, कोलकाता टुर्नामेंटमधून बाहेर गेली आहे.

दोन्ही संघ

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, ईशान किशन, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड, नाथन कूल्टर-नाइल, राहुल चाहर, जेम्स पैटिंसन आणि धवल कुलकर्णी.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा आणि टी नटराजन.