आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Sports
 • Cricket
 • Ipl 2020
 • Mumbai Look Forward To Their First Win In The UAE, Punjab's 100th Victory; Fast Bowling For Chennai And Spinners For Mumbai Is Anxiety

आयपीएल लीगचे 13 वे सत्र उद्यापासून:मुंबई यूएईत पहिल्या विजयासाठी उत्सुक, पंजाबचे शंभर नंबरी यश; चेन्नईसाठी वेगवान गाेलंदाजी तर मुंबईसाठी फिरकीपटूंची चिंता

दुबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
बंगळुरू टीमच्या खेळाडूंनी सरावानंतर पूलमध्ये पाेहण्याचा आनंद लुटला.
 • 2014 मध्येदेखील यूएईत 20 सामने खेळवण्यात आले होते, मुंबईचा सर्व 5 सामन्यांत पराभव झाला होता

यंदाही मुंबई इंडियन्स टीम विजयाची दावेदार मानली जातेय, मात्र यूएईमध्ये त्यांचा विक्रम उलट आहे. २०१४ लीगचे सुरुवातीचे २० सामने यूएईत खेळवण्यात आले होते. मुंबईने सर्व ५ सामने गमावले आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्व ५ सामने जिंकले होते. पंजाब अजेय राहणारी एकमेव टीम आहे. दुसरीकडे, लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जला वेगवान गोलंदाज आणि मुंबईला फिरकी अडचणीची ठरू शकते.

चेन्नईसाठी वेगवान गाेलंदाजी तर मुंबईसाठी फिरकीपटूंची चिंता

1. चेन्नई सुपरकिंग्ज:

सुरेश रैना, हरभजनसिंगची अनुपस्थिती धक्का देणारी ठरली. वॉटसनही लयीत नाही. ऋतुराज सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. धोनी, प्लेसिस व रायडूवर फलंदाजीची मदार.

2. मुंबई इंडियन्स:

कर्णधार रोहित शर्मा, डी कॉक, ईशान किशन व सूर्यकुमार यादववर फलंदाजीची जबाबदारी. पोलार्ड, हार्दिक व कृणाल संघात. जसप्रीत बुमराह व बोल्टवर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.

3. कोलकाता नाइटरायडर्स:

विदेशी खेळाडू म्हणून नरेन, रसेल, माॅर्गन व कमिन्सचे खेळणे निश्चित. शुभमान गिल, कार्तिक व राणावर फलंदाजीची मदार. डावखुरा फिरकीपटू कुलदीप व कृष्णाही अधिक विश्वासु आहे.

4. राजस्थान रॉयल्स:

विदेशी खेळाडूंवर अधिक मदार. कर्णधार स्मिथ, बटलर, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व अष्टपैलू बेन स्टोक्स सर्व विदेशी. सॅमसन व रॉबिन उथप्पा वगळता इतर अनुभवी भारतीय फलंदाज नाही.

5. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू:

कर्णधार कोहली, डिव्हिलर्स व फिंचवर फलंदाजीची जबाबदारी. अष्टपैलू मोईन अली. फिरकीपटू चहल, जम्पा व सुंदरचे त्रिकूट. वेगवान गोलंदाज डेल स्टेन व क्रिस मॉरिस.

6. किंग्ज इलेव्हन पंजाब: संघात मुजीब, सुचिथ, एम. आश्विन व रवी बिश्नोईसारखे फिरकीपटू. कर्णधार राहुल, गेल, मॅक्सवेल, पूरनवर फलंदाजीची मदार.वेगवान गोलंदाज शमी, कॉट्रेल व जॉर्डन.

7. सनरायझर्स हैदराबाद: संघ सलामी फलंदाज वॉर्नर व बेअरस्टोवर अधिक निर्भर. मनीष पांडेसह मधल्या फळीत दुसरा भारतीय फलंदाज नाही. फिरकीपटू राशिद, नबी व नदीम. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर व सिद्धार्थ कौल गत सत्रात चांगले प्रदर्शन करू शकले नाही.

8. दिल्ली कॅपिटल्स: कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, धवन, पंत, रहाणे व हेटमायरसारखे तगडे फलंदाज. अष्टपैलू स्टोइनिस व अक्षर आणि आर. अश्विन, मिश्रा, संदीप फिरकी गोलंदाजी संभाळतील.

या युवांवर खास नजर; पहिल्यांदाच लीगच्या मैदानावर

 • यशस्वी (फलंदाज) राजस्थान
 • ऋतुराज गायकवाड (फलंदाज) चेन्नई
 • रवी बिश्नोई (लेग स्पिनर) पंजाब
 • शेल्डन कॉट्रेल (वेगवान गाेलंदाज) पंजाब
 • अली खान (वेगवान गाेलंदाज) कोलकाता
 • देवदत्त पड्‌डीकल (फलंदाज) बंगळुरू
 • टॉम (फलंदाज) कोलकाता

सामन्यात मोठा स्काेअर आव्हानात्मक; अशात ३०+ धावा ठरतील महत्त्वपूर्ण

यूएईच्या मैदानावर मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाही. १५० ते १६० दरम्यान आव्हानात्मक धावसंख्या मानली जाते. त्यामुळे ३० पेक्षा अधिक धावा महत्त्वाच्या ठरतील. मुंबईच्या ९ खेळाडूंनी ३० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. टीमने २६ वेळा ३० पेक्षा अधिक धावा काढल्या. त्याचबरोबर चेन्नई, पंजाब, कोलकाता, राजस्थान व बंगळुरुच्या प्रत्यकेी ८ खेळाडूंनी ३०+ धावा केल्या.

फिरकी गोलंदाजी महत्त्वाची, कारण गेल्या तीन सत्रांत इकॉनॉमी चांगली

यूएईमधील तिन्ही मैदानांवर फिरकी गोलंदाजांचे प्रदर्शन चांगले राहिले. अशात यंदाच्या लीगमध्ये फिरकीपटू महत्त्वाचे ठरतील. गेल्या तीन सत्रांचा आलेख पाहिल्यास फिरकी गोलंदाजांची इकॉनॉमी सर्वात चांगली आहे. २०१९ मध्ये १० पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या पाच चांगल्या इकॉनॉमी असलेल्यांमध्ये चार फिरकीपटू आहेत. लेग स्पिनर राशिद खानने ६.२८ च्या सरासरीने १७ बळी घेतले.