आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:मुंबईकडे अव्वलस्थानाची संधी; आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नई संघ सज्ज!

दुबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शारजामध्ये मुंबईला पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा प्रवास जवळपास समाप्त झाला आहे. त्यांनी आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केला, मात्र त्यात अपयशी ठरले. त्यामागे अनेक कारणे आहेत. सुरेश रैना व हरभजनसिंगने स्पर्धेतून सुरुवातीलाच माघार घेतली होती. अनेक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले होते. संघात अनेक वयस्क खेळाडू आहेत, ज्यामुळे फिटनेसच्या अडचणी आल्या. रायडू व ब्राव्हो दुखापतीमुळे अनेक सामन्यातून बाहेर झाले. दोन्ही खेळाडू परतले, तोपर्यंत खुप उशीर झाला होता. आता परिस्थिती आणखी खराब झाली. ब्राव्हो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला. केदार जाधव लय मिळवण्यासाठी संघर्ष करतोय, धोनीचे नियोजन चुकत आहे. तो फलंदाजीस तळाला येतोय. सोबत विचित्र प्रतिक्रियादेखील देतोय. राजस्थानविरुद्ध गत सामन्यानंतर त्याने म्हटले की, युवा खेळाडूंमध्ये चमक दिसत नाही. गोलंदाजीत पीयूष चावला व रवींद्र जडेजा संघर्ष करताहेत. मात्र, जडेजाने फलंदाजीत काही चांगल्या खेळी केल्या.

शारजामध्ये मुंबईला पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी
संघ पूर्ण संतुलित व बहरात आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा व क्विंटन डिकॉकने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले. सूर्यकुमार यादव प्रमुख फलंदाज म्हणून पुढे आला. पोलार्ड व पांड्या बंधू मिळून मधल्या फळीत धोकादायक बनले. आता येतो मुंबईच्या गोलंदाजीचा क्रम. बुमराह व बोल्टने जबाबदारी घेतली, मात्र कुल्टर नाइल धावा देतोय. त्याच्या जागी जेम्स पॅटिन्सन परतू शकतो. युवा राहुल चाहर अनुभवाने शिकतोय. कृणाल पांड्याने त्यांना चांगली साथ दिली. शारजामध्ये मुंबईला पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी आहे. दुसरीकडे, आता सुमार खेळीमुळे झालेल्या पराभवाने चेन्नई स्पर्धेतून बाहेर हाेऊ शकते.

मुंबईविरुद्ध नेहमी चेन्नईची माेठी कसरत
आयपीएलमध्ये मुंबई एकमेव टीम आहे, ज्यांच्याविरुद्ध चेन्नई नेहमी संघर्ष करताना दिसते. आतापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये २९ सामने झाले. यामध्ये मुंबईने १७ विजयासह आपले वर्चस्व राखून ठेवले. चेन्नईने १२ विजय मिळवले. गतसत्रात फायनलसह सर्व ४ सामन्यांत मुंबई संघाने चेन्नईला मात दिली.

बातम्या आणखी आहेत...