आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामन्यातील चर्चित चेहरे:चेंडू रोखण्यासाठी पूरनची 4.1 फूट हवेत झेप; खेळू शकणार नसल्याचे डॉक्टरांचे भाकीत फोल

शारजा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किंग्ज पंजाब-राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या निकोल्स पूरन व राहुल तेवाटियाचे यश

शारजा राजस्थान राॅयल्स संघाने रविवारी रात्री आयपीएलच्या सामन्याला कलाटणी देऊन किंग्ज इलेव्हन पंजाबवर राेमहर्षक विजयाची नाेंद केली. राजस्थान संघाने १९.३ षटकांत चार गडयांनी राॅयल्स विजयाची नाेंद केली. यात राजस्थानचा राेमहर्षक विजय, याच टीमच्या युवा फलंदाज राहुल तेवाटियाची तुफानी झंझावाती खेळी आणि प्रतिस्पर्धी पंजाब टीमच्या निकाेल्स पूरनची चित्तथरारक झेप चांगलेच चर्चेत राहिले.

चेंडू राेखण्यासाठी पूरनची ४.१ फूट हवेत झेप; खेळू शकणार नसल्याचे डाॅक्टरांचे भाकीत फाेल

राजस्थानच्या संजू सॅमसनने आठव्या षटकाच्या चाैथ्या चेंडूवर षटकार मारला. याच षटकाराला राेखण्यासाठी पंजाबच्या पूरनने हवेत ४.१ फूट उंच अशी झेप घेतली आणि ६.५ फूट बाउंड्रीच्या आत स्वत:ला हवेत झाेकून दिले. यासह त्याने चेंडूला आतमध्ये फेकले. त्याचे हेच क्षेत्ररक्षण पाहून जगातील सर्वाेत्कृष्ट फिल्डर व पंजाब संघाचे प्रशिक्षक जाँटी ऱ्हाेड्सने स्वत: उभे राहून टाळ्यांनी गाैरव केला. विंडीजच्या निकाेल्स पूरनचा २०१५ मध्ये अपघात झाला. डाॅक्टरांनी आता यापुढे पूरन हा कधीही खेळू शकणार नसल्याचे भाकीत वर्तवले हाेते.

अर्धशतकी टी-२० सामने खेळणारा राहुल तेवाटिया कधीही शून्यावर बाद झाला नाही

राजस्थान राॅयल्ससाठी अवघ्या सामन्याला कलाटणी देणारा युवा फलंदाज राहुल तेवाटियाने करिअरमध्ये आतापर्यंत ५० टी-२० सामने खेळले आहेत. मात्र, ताे कधीही शून्यावर बाद झालेला नाही. ४० सामन्यांत फलंदाजीच्या मिळालेल्या संधीला त्याने सातत्याने सार्थकी लावले. तेवाटियाने २८ च्या सरासरीने ६९१ धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याच्या फलंदाजीचा स्ट्राइक रेट १५५ हाेता. म्हणजेच प्रत्येक १०० चेंडूंत त्याने १५५ धावांची कमाई केली. यामध्ये आतापर्यंत त्याने ६६ चाैकार आणि ३२ षटकार ठाेकले आहेत. त्याने आतापर्यंत राजस्थानसह पंजाब, दिल्ली आणि यजमान हरियाणा संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

राजस्थानसाेबत गत सत्रात करारबद्ध

गतवर्षी राहुल तेवाटिया हा राजस्थान राॅयल्स संघासाेबत करारबद्ध झाला. त्याला ट्रेडिंगच्या माध्यमातून संघात सहभागी करण्यात आले. राहुल हा स्विस किंग टेनिसपटू फेडररचा माेठा चाहता आहे. या २३ वर्षीय फलंदाजाचे आतापर्यंत साेशल मीडियावर ६३७ फाॅलाेअर हाेते. आता हा आकडा १८ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. सध्या त्याच्याच नावाची जाेेरदार चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...