आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मध्ये आज पंजाब vs दिल्ली:पंजाबला सलग चौथ्यांदा सलामीची आज संधी, रहाणेला सुरुवातीच्या सामन्यादरम्यान विश्रांती; काेच पाँटिंगचे संकेत

दुबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबची लढत दिल्ली कॅपिटल्सशी होईल. पंजाबने गत तीन सत्रात आपला सलामी सामना जिंकला आहे. अशात संघ आपला विजयी आलेख कायम राखू इच्छिते. पंजाबने लीगमध्ये सर्वाधिक १४ सामने दिल्ली विरुद्ध जिंकले. दोघांत आतापर्यंत २४ सामने झाले आहेत. दिल्लीने १० लढत नावे केल्या. गेल्या सत्रात दोघांनी एक-एक सामना जिंकला. दिल्लीने गत सत्रात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते, मात्र पंजाब टीम सहाव्या स्थानी राहिली होती.

फिरकीपटूंची लढत पाहायला मिळणार : दोन्ही संघातील फिरकीपटूंचा संघर्ष पाहायला मिळेल. पंजाबमध्ये मुजीब उर रहमान, रवि बिश्नोई, मुरुगन अश्विन आहे, तर दिल्लीची मदार आर. अश्विन, अमित मिश्रा व संदीप लमिछाने सांभाळतील. फलंदाजीमध्ये पंजाबकडे कर्णधार लोकेश राहुल, गेल, ग्लेन मॅक्सवेल व निकोलस पूरन चांगले प्रदर्शन करू शकतात. दिल्लीकडे कर्णधार अय्यर, धवन, पंत व हेटमायर सारखे तगडे फलंदाज आहेत.

रहाणेला सुरुवातीच्या सामन्यादरम्यान विश्रांती; काेच पाँटिंगचे संकेत
दिल्लीचा संघ मजबूत आणि संतुलित आहे. शिखर धवन, पृथ्वी शाॅ, अय्यर, ऋषभ पंत आणि हेटमायरसारखे आघाडीच्या फळीत स्फाेटक फलंदाज आहेत. त्यामुळेच सुरुवातीच्या काही सामन्यांदरम्यान टीमच्या अजिंक्य रहाणेला विश्रांती घ्यावी लागेल, असे संकेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक रिकी पाॅटिंग यांनी दिले. मधल्या फळीसाठी अधिक चुरस रंगणार आहे, असेही ताे म्हणाले. यादरम्यान कर्णधार श्रेयस अय्यरनेही याबाबत अधिक माहिती दिली. रहाणेमुळे संघ मजबूत आहे. असेही कर्णधार श्रेयस म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...