आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:राेहित-काेहलीमध्ये झुंज रंगणार, मुंबईचे पारडे जड, 18 सामने जिंकले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई इंडियन्स-राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू लढत आज

मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना आयपीएलमधील मोठा सामना म्हणून पाहिला जातो. मात्र, रोहित शर्मा जखमी असल्याने तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे गुरुवारचा सामना महत्त्वपूर्ण ठरतो. मुंबईचा कर्णधार अद्याप जखमी आहे आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर करण्यात आले आहे. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही तर सामन्यापूर्वी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव कसा करतोय, हा प्रश्न मनात येतो. मुंबईची टीम अद्याप चांगली कामगिरी करतेय. मात्र, आजच्या लढतीमध्ये राेहितच्या पुनरागमनाने विराट लढत रंगण्याचे चित्र आहे.

गत २ पराभव झाले असले तरी मुंबईची स्थिती मजबूत आहे. आघाडीचे सर्व फलंदाज योगदान देत आहेत. पोलार्ड, हार्दिक व कृणालदेखील लयीत आहेत. सूर्यकुमार यादवकडे विराट कोहलीला दाखवून देण्याची संधी आहे, त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवड करायला हवी होती. मुंबईचे गोलंदाज जबरदस्त फाॅर्मात आहेत. बुमराह, बोल्ट, पॅटिन्सन सलग बळी घेताहेत. च हरने मधल्या षटकांत सर्वांना प्रभावित केले. मात्र, गत सामन्यात राजस्थान रॉयल्सने सहज मोठी धावसंख्या उभारली होती, हा चिंतेचा विषय आहे.

दर्जेदार फलंदाजीची गरज : विराट कोहलीच्या बंगळुरूमध्ये अनेक समस्या आहेत. त्यांचा गत सामन्यात चेन्नईकडून पराभव झाला. विराट व डिव्हिलियर्स वगळता इतर फलंदाजांमध्ये सातत्य नाही. फिंचची बॅट शांत आहे आणि इतर फलंदाज अपयशी ठरले. त्यांची गोलंदाजी चांगली आहे, मात्र त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज वाटते. चहल आणि सुंदरने स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले.

मुंबईचे पारडे जड, 18 सामने जिंकले
मुंबई व बंगळुरू यांच्यात आतापर्यंत आयपीएलचे २६ सामने खेळवण्यात आले आहेत. यात मुंबई संघाने १६ आणि बंगळुरूने १० सामन्यांत विजय मिळवला. चॅम्पियन लीगमध्ये झालेले दोन सामनेदेखील मुंबईने जिंकले आहेत.