आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

RR vs DC LIVE:दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 46 धावांनी पराभव; दिल्लीने राजस्थान रॉयल्सला दिले होते 185 धावांचे लक्ष्य

शारजाह21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 23वा सामना राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी)दरम्यान शारजाहमध्ये होत आहे. दिल्लीने राजस्थानला 185 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ 138 धावांवर ऑल आउट झाला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दिल्लीकडून शारजाहमध्ये हा या सीजनचा सर्वात लहान स्कोअर झाला. यापूर्वी या मैदानावर झालेल्या 4 सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दिल्लीकडून शेमरॉन हेटमायरने 45 आणि मार्कस स्टोइनिसने 39 रन केले राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय अँड्र्यू टाय, राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागीला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या.

पावर-प्लेमध्ये दिल्लीने 3 विकेट गमवल्या

दिल्लीची खूप खराब सुरूवात झाली. सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये सलामी जोडी शिखर धवन (5)आणि पृथ्वी शॉ (19) आउट झाले. जोफ्रा आर्चरने दोघांची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर (22) रन आउट झाला.

राजस्थानमध्ये दोन बदल

राजस्थान संघात दोन बदल करण्यात आले आहेत. टॉम करन आणि अंकित राजपूतच्या जागी अँड्र्यू टाय आणि वरुण एरॉनला संधी देण्यात आली आहे. तर, दिल्लीमध्ये कोणतेच बदल करण्यात आले नाही.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.

राजस्थान: जोस बटलर (विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, संजू सैमसन, स्टीव स्मिथ (कर्णधार), महिपाल लोमरोर, एंड्र्यू टाई, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, वरुण एरॉन आणि कार्तिक त्यागी.