आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:काेलकात्याच्या रायडर्ससमाेर आज बंगळुरू संघाचे विराट आव्हान! पहिला सामना बंगळुरूने जिंकला हाेता

दुबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अबुधाबीमध्ये भिडण्यास सज्ज झाले. कोलकातासाठी आतापर्यंतचा प्रवास चढ-उताराचा ठरला. मात्र, हैदराबादविरुद्ध टीम अखेरच्या सामन्यात लयीत येताना दिसली. त्यांचा फलंदाजी क्रम योग्य दिसतोय. गोलंदाजी चांगली कामगिरी करताहेत. सध्या संघासाठी मुख्य अडचण आहे ती म्हणजे, आंद्रे रसेलचा फाॅर्म व फिटनेस. हैदराबादविरुद्ध तो अपयशी ठरला. सामन्यात अखेरच्या षटकांत तो तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याच्या जागी सुनील नरेन संघात परतू शकतो. त्याच्या गोलंदाजी शैलीला क्लीन चिट मिळाली आणि त्याची फलंदाजी बोनस असेल. संघाकडे ख्रिस ग्रीन व टॉक बँटनचा पर्याय आहे, मात्र ते अष्टपैलूला स्थान देऊ शकतात. कोलकातासाठी चांगली गोष्ट वेगवान गोलंदाज लॉक फर्ग्युसन आहे. सत्रातील आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध त्याने विजयी स्पेल टाकला. सुपर ओव्हरमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.

बंगळुरूची टीम गरजेपेक्षा कर्णधार विराट काेहली, स्फाेटक फलंदाज डिव्हिलियर्सवर अधिक अवलंबून
बंगळुरू विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्सवर गरजेपेक्षा अधिक निर्भर आहेत. दोघे चांगल्या बहरात आहेत. डिव्हिलर्स राजस्थान विरुद्ध विजयी खेळी करून आला आहे. त्याला पहिल्या सामन्यात टीमने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. कोहली चांगल्या फाॅर्मत असून डावावर नियंत्रण राखतोय. देवदत्त पड्डीकलने चांगले प्रदर्शन केले, मात्र आता अॅरोन फिंच फाॅर्मसाठी झगडतोय.ख्रिस मॉरिस परतल्यानंतर गोलंदाजीत सुधारणा झाली. नवदीप सैनी व इसुरू उडानाने त्याला मदत केली. चहल फलंदाजांना फिरकीत अडकवतोय, तर सुंदर पाॅवर प्लेमध्ये धावा रोखतोय. दोन्ही संघांकडे मिळवण्यासाठी आणखी खूप काही आहे. त्यामुळे एक रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.

ओव्हरऑल काेलकाता संघ वरचढ
दोन्ही संघांत आयपीएलच्या इतिहासात पहिल्या सामन्यासह २६ लढती झाल्या. कोलकाताने १५ आणि बंगळुरूने ११ सामने जिंकले. यंदाच्या सत्रात कोलकाताचे ९ सामन्यांत १० आणि बंगळुरूचे ९ सामन्यांत १२ गुण आहेत.

बातम्या आणखी आहेत...