आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:राजस्थानसमाेर आपल्या आवडत्या शारजा मैदानावर दिल्लीचे आव्हान, दिल्लीकडे पॉईंट टेबलमध्ये टॉपवर पोहोचण्याची संधी

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल २०२० मध्ये सलग तीन सामने गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे पुनरागमन आपल्या आवडते मैदान शारजा क्रिकेट स्टेडियमवर होईल. जेथे त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. राजस्थानचे दोन विजय याच मैदानावरील आहेत. खराब कामगिरीनंतर या मैदानावर पुन्हा खेळणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. त्यांच्यापुढे दुसरे आव्हान असेल मोमेंटम बदलणे. त्यांना आशा आहे, दिल्ली विरुद्ध सामन्यात त्याचे नशीब बदलेल. पराभवानंतर त्यांची गाडी रुळावरून उतरताना दिसते. युवा खेळाडू संघात असताना त्यांची परिस्थिती चांगली नाही. कर्णधार स्टीव स्मिथला उर्वरित सामन्यात चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित करावे लागेल, त्यानंतर संपूर्ण फलंदाजीचा क्रम आपोआप चांगला होईल.

पंजाबचा लेग स्पिनर मयंक मार्केडेला राॅयल्सकडून पदार्पणाची संधी मिळू शकते. तो श्रेयस गोपालसह मधल्या षटकांत महत्त्वाचा ठरू शकतो. जोफ्रा आर्चरने शानदार कामगिरी केली आहे, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळणारा युवा कार्तिक त्यागी उत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र, ज्याप्रकारे दुसऱ्यांनी गोलंदाजी केली, त्यात कमतरता दिसते. संघाच्या मधल्या क्रमांत खूप गडबड आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser