आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएलच्या चालू सत्रामध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीवर टीका केली. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मॅक्सवेलने या सत्रातील सात सामन्यांत केवळ ५८ धावा काढल्या. सेहवागने म्हटले की, “मॅक्सवेल १०.७५ कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीच्या लायक नाही. त्याला आणखी काय पाहजे? धावा बनवण्यासाठी कशी संधी हवी? हैदराबादविरुद्ध पंजाबचे दोन गडी लवकर बाद झाले होते. मॅक्सवेलकडे फलंदाजीची संपूर्ण संधी होती. प्रथम फलंदाजी करतानादेखील तो बाद होतो. प्रत्येक वर्षी लिलावात तो महागडा ठरतो अन् खेळात अपयशी ठरतो तरीदेखील लोक त्याच्या मागे का धावतात हे मला समजत नाही.
आता पुढील लिलावात त्याची किंमत १० कोटींवरून कमी होत १-२ कोटी रुपये होईल. मॅक्सवेलने अखेरचे अर्धशतक २०१६ मध्ये ठोकले होते. त्याने सामन्यात पूरनला चांगली साथ देत एक-दाेन धावा काढल्या असत्या तरी पूरनने एकट्याने सामना जिंकून दिला असता. पूरन दबावात बाद झाला.’ त्या सामन्यात मॅक्सवेल केवळ ७ धावांवर बाद झाला होता. मॅक्सवेलने ७५ आयपीएल सामन्यांत २२.३४ च्या सरासरी व १५६.५५ च्या स्ट्राइक रेटने १४४५ धावा काढल्या आहेत. यात केवळ सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर सेहवागने चांगलीच टीका केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.