आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2020
  • Short Run Dispute : Punch Memon's Wrong Decision Hits Punjab; One Run Given Instead Of Two, So Super Over; Elite Panel Referee's Mistake In Second Session In A Row

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉर्ट रनचा वाद:पंच मेमन यांच्या चुकीच्या निर्णयाचा पंजाबला फटका; दोनऐवजी दिला एक रन, त्यामुळे सुपर ओव्हर; सलग दुसऱ्या सत्रात एलिट पॅनलच्या पंचांची चूक

दुबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच कोरोना टेस्टनंतरही मी हसत होते, मात्र, एका शॉर्ट रनने हरवले चेहऱ्यावरचे स्माइल : प्रीती

आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील दुसरा सामना अधिकच राेमांचक आणि चर्चेत राहिला. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील रंगतदार सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ विजेता ठरला. मात्र, पंचांच्या चुकीच्या निर्णयाची आता चर्चा रंगत आहे. याच चुकीच्या निर्णयाचा माेठा फटका किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला बसला आहे. पंच मेमन यांनी पंजाबला एका धावेला शाॅर्ट रन असल्याचे सांगितले. टीमला एका धावेमुळे नुकसानीला सामाेरे जावे लागले. या एकाच धावेमुळे हा सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५७ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पंजाब संघानेही चुरशीची खेळी करताना आठ गड्यांच्या माेबदल्यात १५७ धावा काढल्या. यासह हा सामना टाय झाला. याच डावाच्या १९ व्या षटकात दिल्लीच्या रबाडाने गाेलंदाजी केली. मयंकने दुसऱ्या चेंडूवर चाैकार मारला. त्यानंतरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरवर मारून दाेन धावा घेतल्या. मात्र, याच दरम्यान पंच मेमन यांनी शाॅर्ट रनच्या नावाखाली यातील एकच धाव दिली. त्यामुळे पंजाबला यातील एकच रन मिळाला. मात्र, टीव्हीच्या रिप्लेमध्ये ही पूर्ण धाव असल्याचे दिसून आले. त्यामुळेच पंच नितीन मेमन यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे पंजाबचे एका धावेने नुकसान झाले.

पाच काेराेना टेस्टनंतरही मी हसत हाेते, मात्र, एका शाॅर्ट रनने हरवले चेहऱ्यावरचे स्माइल : प्रीती

काेराेनाच्या वाढत्या संसर्गातही मी काेणत्याही प्रकारची भीती न बाळगता दुबईपर्यंत प्रवास केला. यादरम्यान पाच काेराेना टेस्टही मी हसत हसत केल्या. मात्र, आता शाॅर्ट रनच्या निर्णयाने माेठा धक्का बसला. यामुळेच चेहऱ्यावरचे स्माइलच हरवले आहे, अशा शब्दांत पंजाब संघाची सहमालकीण आणि सिनेअभिनेत्री प्रीती झिंटाने पंच मेमन यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

गत सत्रात पंच रवी यांना नाही दिसला नाे बाॅल

गतवर्षीही मुंबई इंडियन्स व बंगळुरू सामन्यादरम्यानची गंभीर चूक चर्चेत राहिली. एलिट पॅनलचे पंच एस.रवी यांना मलिंगाचा नाे बाॅल दिसला नाही. त्यामुळे बंगळुरूचा सामन्यात पराभव झाला. काेहली, राेहितने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला हाेता.

सामनावीराच्या निर्णयावर वीरूची गुगली

या सामन्यादरम्यान मॅन आॅफ द मॅचसाठी निवडलेल्या खेळाडूच्या निर्णयाबाबत मी प्रचंड नाराज आहे. या सामनावीर पुरस्काराचे खरे मानकरी पंच मेमन आहेत. त्यांनाच हा पुरस्कार दिला जायला हवा हाेता, अशा शब्दांत शाॅर्ट रनच्या निर्णयाची वीरेंद्र सेहवागने चांगलीच खिल्ली उडवली. यादरम्यान समालाेचक आकाश चाेप्रा आणि इतरांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...