आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:हैदराबादसाठी करा वा मरा; दिल्ली टीमचा आज प्ले आॅफ प्रवेश निश्चित!

दुबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत पराभवातून सावरलेला श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ यंदा आयपीएलच्या प्ले आॅफमधील प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने आज मैदानावर उतरणार आहे. याची दिल्ली संघाला माेठी संधी आहे. दुबईच्या मैदानावर आज मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. आजच्या पराभवाने हैदराबाद संघाच्या प्ले आॅफमधील प्रवेशाच्या आशा पूर्णपणे मावळणार आहे. त्यामुळे बलाढ्य दिल्लीला पराभूत करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी हैदराबाद संघ उत्सुक आहे. यासाठी टीमला माेठी कसरत करावी लागणार आहे. मात्र, यातील पराभवाने टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. गत सामन्यात हैदराबादला पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे हैदराबाद टीम अडचणीत सापडली आहे. आता एका विजयाने या संघाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याची शेवटची संधी आहे. टीमचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरसह जाॅनी बैयरस्ट्राे आणि रशीद खान सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, टीमला अद्याप अव्वल कामगिरीचा सूर गवसलेला नाही. मनीष पांडे, विजय शंकर आणि प्रियम गर्गला अद्याप समाधानकारक अशी माेठी खेळी करता आली नाही. त्याचाच फटका टीमला बसत आहे.

दिल्लीची मदार रबाडावर
सध्या दिल्लीचा संघ सुमार फलंदाजीमुळे अपयशाला सामाेरे जात आहे. त्यामुळे फलदंाजीमधील सुधारणा टीमला तारू शकणारी आहे. दुसरीकडे गाेलंदाजीमध्ये दिल्ली संघाचे पारडे जड मानले जाते. टीमचा कागिसाे रबाडा हा यंदाच्या लीगमधील सर्वाधिक यशस्वी गाेलंदाज ठरला आहे. त्याने ११ सामन्यांत सर्वाधिक २३ विकेटसह आपल्याकडील पर्पल कॅप कायम ठेवली आहे. त्यामुळे संघाला आता त्याच्याकडून माेठी आशा आहे. कारण, हैदराबादसाठी हा ‘करा वा मरा’ असा सामना आहे. विजयाने दिल्लीला प्रवेश निश्चित करता येईल.

बातम्या आणखी आहेत...