आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:हैदराबाद-पंजाब सामन्यात षटकारांचा पाऊस, एकूण 16 षटकार लागले, पंजाबकडून पूरनने सर्व 7 षटकार मारले

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या माेबदल्यात पंजाबसमाेर २०२ धावांचे माेठे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात रशीद खान (३), नटराजन (२/२४) आणि खलील अहमदने (२/२४) पंजाब टीमला १६.५ षटकांत अवघ्या १३२ धावांवर राेखले. पंजाब संघाकडून निकाेल्स पूरनने (७७) एकाकी झंुज दिली. मात्र, इतर फलंदाजांच्या अपयशाने टीमला पराभव टाळता आला नाही. या सामन्यात एकूण 16 षटकार आणि 24 चौकार लागले. पंजाबकडून एकूण 7 षटकार पुरनने मारले.

बैयरस्ट्राेची झंझावाती खेळी; शतक हुकले
सनरायझर्स हैदराबाद संघाच्या विजयासाठी जाॅनी बैयरस्ट्राेची झंझावाती खेळी अधिक आधाराची ठरली. त्यामुळे हैदराबाद संघाला माेठ्या फरकाने विजयाची नाेंद करता आली. सलामीवीर बैयरस्ट्राेने आपल्या टीमचा सहकारी आणि कर्णधार डेव्हिड वाॅर्नरसाेबत पंजाबच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यातूनच त्याने शानदार ९७ धावांची खेळी केली. मात्र, अवघ्या तीन धावांनी त्याचे शतक हुकले. त्याला युवा गाेलंदाज रवी बिश्नाेईने पायचीत केले. बैयरस्ट्राेने कर्णधार आणि सलामीवीर वाॅर्नरसाेबत पहिल्या गड्यासाठी १६० धावांची भागीदारी रचली.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 50 व्या वेळेस 50+ स्कोर केला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 50 व्या वेळेस 50+ स्कोर केला.
जाॅनी बैयरस्ट्राेने 55 चेंडूत 97 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 6 षटकार मारले.
जाॅनी बैयरस्ट्राेने 55 चेंडूत 97 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 6 षटकार मारले.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने जाॅनी बैयरस्ट्राेचा झेल सोडला होता. त्यावेळी जाॅनी बैयरस्ट्राे 19 धावांवर खेळत होता. पंजाबला हा झेल सोडणे महागात पडले.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने जाॅनी बैयरस्ट्राेचा झेल सोडला होता. त्यावेळी जाॅनी बैयरस्ट्राे 19 धावांवर खेळत होता. पंजाबला हा झेल सोडणे महागात पडले.
कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (52) आणि जाॅनी बैयरस्ट्राे (97) यांनी दीडशतकी भागीदारी केली.
कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (52) आणि जाॅनी बैयरस्ट्राे (97) यांनी दीडशतकी भागीदारी केली.
पंजाबचा रवी बिष्णोईने एकाच ओव्हरमध्ये डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बैयरस्ट्राेला बाद करून संघाला थोडा दिलासा दिला.
पंजाबचा रवी बिष्णोईने एकाच ओव्हरमध्ये डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बैयरस्ट्राेला बाद करून संघाला थोडा दिलासा दिला.
जाॅनी बैयरस्ट्राे आयपीएलमध्ये आपल्या दुसऱ्या शतकापासून दूर राहिले.
जाॅनी बैयरस्ट्राे आयपीएलमध्ये आपल्या दुसऱ्या शतकापासून दूर राहिले.
पंजाबच्या अर्शदीप सिंहने सामन्यात 2 विकेट घेतल्या.
पंजाबच्या अर्शदीप सिंहने सामन्यात 2 विकेट घेतल्या.
हैदराबादच्या केन विलियम्सने 10 चेंडूत 20 धावा काढल्या. या सामन्यात एक चौकार आणि एक षटकार मारला.
हैदराबादच्या केन विलियम्सने 10 चेंडूत 20 धावा काढल्या. या सामन्यात एक चौकार आणि एक षटकार मारला.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्येही कमाल दाखवली.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्येही कमाल दाखवली.
सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर फॅन्सच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.
सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर फॅन्सच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser