आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2020
  • Sunil Gawaskar IPL 2020: Social Media Campaign Against Sunil Gawaskar After His Comment On Virat And Anushka During RCB Vs Kings 11 Punjab

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावस्करांविरुद्ध संताप:सुनिल गावस्करांवर भडकले विराट-अनुष्काचे फॅन्स, आयपीएलमधून हकालपट्टी करण्याची होत आहे मागणी; कमेंट्री करताना वापरली होती असभ्य भाषा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराटने केएल राहुलच्या दोन कॅच सोडल्या, नंतर बॅटिंग करताना एकच रनवर बाद

दिग्गज माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर यांना आयपीएलच्या कमेंट्रीमधून हकलून लावण्याची मागणी होत आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवर टीका करताना गावस्करांनी असभ्य भाषा वापरली होती. त्यावरच विरुष्काचे फॅन्स गावस्करांवर भडकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यात विराटने केएल राहुलचे कॅच सोडले होते. त्यावर बोलताना गावस्करांनी अनुष्काचा संदर्भ जोडून भाष्य केले होते.

पंजाबविरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूला पराभव पत्कारावा लागला. या पराभवाचे खापर सामना सुरू असताना विराटवर फोडण्यात आले. विराट या सामन्यात काहीच करू शकला नाही. उलट पंजाबचा सर्वात चांगला परफॉर्मर राहिलेल्या केएल राहुलच्या दोन झेल त्याने सोडून दिल्या होत्या. यानंतर केएल राहुलने पंजाबसाठी 134 धावा ठोकल्या. तर विराट स्वतः बॅटिंग करताना केवळ एकाच धावावर बाद झाला.

काय म्हणाले गावस्कर?

विराटच्या परफॉर्मन्सवर गावस्कर कमेंट्री करताना भडकले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, विराटने लॉकडाउनमध्ये काहीच सराव केला नाही. "विराटने लॉकडाउनमध्ये केवळ अनुष्काच्या चेंडूंवर प्रॅक्टिस केली" असे ते म्हणाले होते. तेव्हापासूनच रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा विराट कोहली आणि अनुष्काचे फॅन्स गावस्करांना ट्रोल करत आहेत. गावस्करांना आयपीएलच्या कमेंट्रीमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांना आयपीएलमधून हकलून लावायला हवे अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.

बातम्या आणखी आहेत...