आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 22वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेवन पंजाबदरम्यान आज दुबईमध्ये झाला. यात हैदराबादने पंजाबला 69 धावांनी पराभूत केले. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला 202 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबचा संघ 132 धावांर ऑल आउट झाला. हैदराबादकडून राशिद खानने 4 ओव्हरमध्ये फक्त 12 रन देऊन 3 विकेट घेतल्या. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
हैदराबादकडून कर्णधार डेविड वॉर्नरने 52 आणि जॉनी बेयरस्टो 97 धावा केल्या. वॉर्नर आणि बेयरस्टोने 150+ रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली. बेयरस्टोने आयपीएलमध्ये आपली 5वी फिफ्टी केली आहे.
दोन्ही संघ
सनरायजर्स हैदराबाद : डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद आणि टी नटराजन.
किंग्स इलेवन पंजाब : लोकेश राहुल (कर्णधार, विकेटकीपर), मयंक अग्रवाल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, प्रबसिमरन सिंह, ग्लेन मैक्सवेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुजीब-उर-रहमान, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉटरेल.
भुवनेश्वर आणि मार्श टूर्नामेंटमधून बाहेर
भुवनेश्वर कुमार आणि मिशेल मार्श दुखापतीमुळे टूर्नामेंटमधून बाहेर झाले आहेत. दोघांच्या जागी पृथ्वीराज यार्रा आणि जेसन होल्डरला संघात घेतले आहे. दरम्यान या दोन्ही संघात झालेल्या अखेरच्या 5 सामन्यात हैदराबादने 3 आणि पंजाबने 2 सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये हैदराबादचा सक्सेस रेट 53.09% आहे. तर पंजाबचा सक्सेस रेट 45.58% आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.