आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 29वा सामना सनरायजर्स हैदराबाद (एसआरएच) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) दरम्यान दुबईत झाला. या सामन्यात चेन्नईकडून हैदराबादचा 20 धावांनी पराभव झाला. चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबादला 168 धावांचे लक्ष्य दिले होते. हैदराबादचा संघ फक्त 147 धावांची मजल मारू शकला. या विजयासट चेन्नईने गुणतालिकेत सहाव्या नंबरवर झेप घेतली आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
चेन्नईकडून अंबाती रायडूने 41 धावा केल्या. खलील अहमदच्या बॉलवर डेविड वॉर्नरने कॅच घेतली. यानंतर शेन वॉटसनला नटराजनने आउट केले. रायडूने वॉटसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 81 रनांची पार्टनरशिप केली. हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने चेन्नईच्या फाप डु प्लेसिस आणि सॅम करनला आउट केले. डू प्लेसिस झिरोवर तर सॅम करन 31 रनांवर क्लीन बोल्ड झाला.
दोन्ही संघातील परदेशी खेळाडू
चेन्नईच्या प्लेइंग इलेवनमध्ये शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, सॅम करन आणि ड्वेन ब्रावोसारखे दमदार खेळाडून आहेत. तर, हैदराबादमध्ये कर्णधार डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन आणि राशिद खानसारखे धुरंदर आहेत.
दोन्ही संघ
चेन्नई: शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा, सैम करन, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, पीयूष चावला, कर्ण शर्मा आणि शार्दुल ठाकुर.
हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्मधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, विजय शंकर, शाहबाज नदीम, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि खलील अहमद.
चेन्नईने 3 आणि हैदराबादने 2 वेळा टुर्नामेंट जिंकला
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 2010, 2011 आणि 2018 मध्ये टुर्नामेंट जिंकला आहे. तर चेन्नई पाच वेळा( 2008, 2012, 2013, 2015 आणि 2019) आयपीएल रनरअप ठरली आहे. दुसरीकडे हैदराबादने 2 वेळा (2009 आणि 2016) आयपीएल किताब आपल्या नावावर केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.