आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SRH vs DC:सनरायजर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सचा 88 धावांनी पराभव; राशिद खानने घेतल्या 3 विकेट

दुबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 47वा सामना सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) दरम्यान दुबईत होत झाला. या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी पराभव केला आहे. हैदराबादने दिल्लीला दुबईतील सर्वात मोठे 220 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीचा संघ सर्वबाद 131 धावांची मजल मारू शकला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

हैदराबादच्या राशिद खानने 4 ओव्हरमध्ये 7 रन देऊन 3 विकेट घेतल्या. ही राशिदच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. राशिदशिवाय संदीप शर्मा आणि टी नटराजनने 2-2, शाहबाज नदीम, जेसन होल्डर आणि विजय शंकरे 1-1 विकेट घेतली.

धवन-स्टोइनिस स्वस्तात आउट

दिल्ली कॅपिटल्सची अतिशय खराब सुरुवात झाली. ओपनर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. संदीप शर्माने धवनला शून्य धावांवर आउट केले. यानंतर मार्कस स्टोइनिसदेखील 5 रन काढून शाहबाज नदीपच्या बॉलवर आउट झाला. यानंतर शिमरन हेटमायर आणि अजिंक्य रहाणेला राशिद खानने आउट केले.

हैदराबादकडून कर्णधार डेविड वॉर्नर 66 रन काढून रविचंद्रन अश्विनच्या बॉलवर आउट झाला. यानंतर साहा 45 बॉलवर 87 रन काढून एनरिच नोर्तजेच्या बॉलवर आउट झाला.

हैदराबादने पावर-प्लेमध्ये 77 रन केले

कर्णधार डेविड वॉर्नर आणि ऋद्धिमान साहाने संघासाठी वेगवान सुरूवात करुन दिली. दोघांनी पावर-प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 77 रन केले. वॉर्नरने IPL मध्ये 47वे अर्धशतक लगावले. दोघांनी 113 रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली.

दोन्ही संघातील परदेशी खेळाडू

हैदराबादमध्ये कर्णधार डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, जेसन होल्डर आणि राशिद खान आहेत. तर, दिल्लीत शिमरॉन हेटमायर, मार्कस हेटमायर, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे परदेशी खेळाडू आहेत.

हैदराबादमध्ये 3 बदल

हैदराबाद टीममध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्टो, प्रियम गर्ग आणि खलील अहमदला प्लेइंग इलेवनमध्ये संधी दिली नाही. त्यांच्या जागी केन विलियम्सन, ऋद्धिमान साहा आणि शाहबाज नदीमला घेण्यात आले आहे. तर, दिल्लीमध्ये कोणतेच बदल केले नाहीत.

दोन्ही संघ

दिल्ली: अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेट कीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, एनरिच नोर्तजे आणि तुषार देशपांडे.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), केन विलियम्सन, मनीष पांडे, विजय शंकर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), जेसन होल्डर, शाहबाज नदीम, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा आणि टी नटराजन.

बातम्या आणखी आहेत...