आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचा हैदराबादवर 17 धावांनी विजय:IPL च्या इतिहासात पहिल्यांदा दिल्ली फायनल खेळणार, 10 नोव्हेंबरला मुंबईशी सामना

अबुधाबी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील दुसरा क्वालिफायर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH)दरम्यान अबुधाबीमध्ये झाला. या सामन्यात दिल्लीकडून हैदराबादचा 17 धावांनी पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने हैदराबादला 190 धावांचे लक्ष दिले होते. प्रत्युत्तरात हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 172 रन केले. यासोबतच दिल्लीने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता 10 नोव्हेंबरला दिल्लीचा मुंबईशी सामना होईल. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

नॉकआउटमध्ये विलियम्सनचे दुसरे अर्धशतक

हैदराबादच्या केन विलियम्सन (67) ने आयपीएलमध्ये आपले 15वे अर्धशतक लगावले. स्टोइनिसने केनला रबाडाकडे झेलबाद केले. विलियम्सन नॉकआउट (प्ले-ऑफ) मध्ये 2 अर्धशतक लगावणारा या सीजनचा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2013 मध्ये ड्वेन स्मिथ, 2014 मध्ये सुरेश रैना, 2015 मध्ये लेंडल सिमन्स, 2016 मध्ये डेविड वॉर्नर आणि 2019 मधये शेन वॉटसनने हा किर्तीमान केला आहे.

हैदराबादने 5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या

हैदराबादची खराब सुरुवात झाली. कर्णधार डेविड वॉर्नर, प्रियम गर्ग आणि मनीष पांडे सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये आउट झाले. वॉर्नरला 2 रनांवर कगिसो रबाडाने प्रियम गर्ग (17) आणि मनीष पांडे (21) ला मार्कस स्टोइनिसने एकाच ओव्हरमध्ये आउट केले.

दिल्लीचा चांगली सुरुवात

दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांचे खेळी करत आयपीएलमध्ये आपले 41 वे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर शिमरन हेटमायरने 42 आणि मार्कस स्टोइनसने 38 धावा केल्या. हैदराबादकडून संदिप शर्मा, राशिद खान आणि जेसन होल्डरने 1-1 विकेट घेतल्या.

दोन्ही संघ

दिल्ली: शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), श्रीवत्स गोस्वामी (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा आणि टी नटराजन.

बातम्या आणखी आहेत...