आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRH vs KKR:सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय; सीजनमध्ये तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निर्णय

अबु धाबी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फर्ग्यूसनने 3 बॉलवर हैदराबादला 2 धावांवर थांबवले, केकेआरने 4 बॉलमध्ये सामना आपल्या नावे केला

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 35वा मॅचमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने सनरायजर्स हैदराबाद (SRH)ला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. केकेआरसाठी सुपर ओव्हरमध्ये फर्ग्यूसनने 3 बॉलवर डेविड वॉर्नर आणि अब्दुल समदला आउट केले. हैदराबाद सुपर ओव्हरमध्ये फक्त 2 धावा काढू शकले. केकेआरने 4 बॉलमध्येच सामना आपल्या नावे केला. हैदराबादसाठी राशिद खानने सुपर ओव्हर टाकली. सामन्याचा स्कोअर पा​​​​​हण्यासाठी येथे क्लिक करा...

हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने हैदराबादला 164 धावांचे लक्ष्य दिले. हैदराबादने 163 धावा काढून सामना टाय केला. आता सुपर ओव्हरमध्ये निर्णय झाला. सीजनमध्ये तिसऱ्यांना सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निर्णय झाला.

सामन्यात कोलकाताने 5 विकेटवर 163 रन काढले. हैदराबादनेही 6 विकेटवर 163 रन काढून सामना टाय केला. वॉर्नर, अब्दुल समद आणि राशिद खानने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 54 रन केले.

आयपीएलमध्ये वॉर्नरच्या 5 हजार धावा पूर्ण

हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने आयपीएलमध्ये आपल्या 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम करणारा तो पहिला परदेशी आणि चौथा ओव्हरऑल खेळाडू आहे. यापूर्वी विराट कोहली (5759), सुरेश रैना (5368) आणिर रोहित शर्मा (5149)ने पाच हजार धावा केल्या आहेत.

केकेआरच्या ओपनर्सनी चांगली सुरुवात केली

कोलकाताचे ओपनर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने केकेआरला चांगली सुरुवात करुन दिली. पावर-प्लेमध्ये दोघांनी 48 रन केले. सहाव्या ओव्हरमध्ये राहुल 23 रन काढून नटराजनच्या बॉलवर आउट झाला.

गिल आणि राणा मोठा स्कोअर करू शकले नाही

केकेआरच्या शुभमन गिल आणि नीतीश राणाला चांगली सुरुवात मिळाली. पण, दोघे या स्कोअरला मोठ्या स्कोअरमध्ये बदलू शकले नाही. गिलने 37 बॉलवर 36 रन केले. त्याला राशिद खानने आउट केले. यानंतर राणादेखील 29 रन काढून विजय शंकरच्या बॉलवर आउट झाले.

रसेलचा खराब फॉर्ममध्ये

सीजनमध्ये आंद्रे रसेलचा खराब फॉर्म सुरुच आहे. रसेलने 11 बॉलवर फक्त 9 रन केले. रसेलने आतापर्यंत आठ सामन्यात फक्त 92 धावा केल्या. त्याचा सर्वाधिक स्कोअर 24 रन आहे.

सुनील नरेनला क्लीन चिट

सामन्यापूर्वी केकेआरसाठी चांगली बातमी आहे. संघाचा महत्वाचा खेळाडून सुनील नरेनला आयपीएलच्या संशयित बॉलिंग अॅक्शन कमेटीने क्लीन चिट दिली आहे. 10 ऑक्टोबरला किंग्स इलेवन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात अंपायरच्या तक्रारीनंतर नरेनला वॉर्निंग लिस्टमध्ये टाकले होते. यानंतर नरेनला मुंबई आणि बंगळुरूविरोधात झालेल्या सामन्यात खेळता आले नव्हते.

दोन्ही संघ

कोलकाता: राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नीतीश राणा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), इयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, पैट कमिंस, शिवम मावी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन आणि वरुण चक्रवर्ती.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, टी. नटराजन आणि बासिल थम्पी.

बातम्या आणखी आहेत...