आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

SRH vs RR:राजस्थान रॉयल्सकडून सनरायजर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव; तेवतिया-परागच्या दमदार फलंदाजीने पलटला सामना

दुबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 26वा सामना सनरायजर्स हैदराबाद (एसआरएच) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) दरम्यान आज दुबईमध्ये झाला. हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला 159 धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थानने 5 गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला. राजस्थानकडून तेवतिया आणि परागने दमदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादकडून सामना हिसकाऊन घेतला. राजस्थानने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 69 धावा केल्या. राहुल तेवतियाने 45 आणि रियान परागने 42 धावांची दमदार खेळी केली. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

स्टोक्स-स्मिथ स्वस्तात आउट

सीजनमध्ये आपला पहिला सामना खेळत असलेला राजस्थान रॉयल्सचा ऑलराउंडर बेन स्टोक्स चांगली कामगिरी करू शकला नाही. बेनने जोस बटलरसोबत इनिंगसी सुरुवात केली, पण स्टोक्स फक्त 5 धावांवर खलील अहमदच्या बॉलवर आउट झाला. यासोबतच कर्णधार स्टीव स्मिथही 5 रनांवर आउट झाला.

हैदराबादकडून सलामीला उतरलेला जॉनी बेयरस्टोने 16 धावा काढल्या. कार्तिक त्यागीने बेयरस्टोला आउट केले. त्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नर 48 धावांवर आउट झाला. वॉर्नरला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले. त्यानंतर मनीष पांडेला जयदेन उनादकदने आउट केले. पांडेने 54 धावा केल्या. यासोबतच पांडेने आपल्या आयपीएल करिअरमधली 17वी फिफ्टी केली.

वॉर्नर-मनीषमध्ये 73 रनांची पार्टनरशिप झाली

हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि मनीष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी 73 रनांची पार्टनरशिप केली. दरम्यान, 54 पांडेने आपल्या आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा पल्ला गाठणारा पांडे 16वा खेळाडून आहे. पांडेने 137 मॅचच्या 127 इनिंगमध्ये ही कामगिरी केली.

हैदराबादचा पॉवर-प्लेमध्ये तिसरा सर्वात कमी स्कोअर

एसआरएचची सुरुवात मंद झाली. ओपनर जॉनी बेयरस्टो 16 रनांवर आउट झाला. संघाने पॉवर प्लेच्या 6 ओवरमध्ये एक विकेट गमावून 26 रन केले. यापूर्वी 2013 मध्ये हैदराबादने पूणे वॉरियर्स इंडियाविरोधात पॉवर प्लेमध्ये 25 आणि राजस्थान रॉयल्सविरोधात 21 रन केले होते.

राजस्थानमध्ये 4 आणि हैदराबादमध्ये एक बदल

राजस्थानमध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. ऑलराउंडर बेन स्टोक्सला अँड्र्यू टायच्या जागी संघात जागा देण्यात आली आहे. यशस्वी जायसवाल, महिपाल लोरमोर आणि वरुण एरॉनच्या जागी रॉबिन उथप्पा, रियान पराग आणि जयदेव उनादकटला संघात घेतले आहे. तर, हैदराबादमध्ये अब्दुल समदऐवजी विजय शंकरला संघात जागा दिली आहे.

दोन्ही संघ

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, विजय शंकर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद और टी नटराजन.

राजस्थान: जोस बटलर (विकेटकीपर), रॉबिन उथप्पा, संजू सैमसन, स्टीव स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, रियान पराग, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, जयदेव उनादकट आणि कार्तिक त्यागी.