आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SRH vs RCB:हैदराबादचा बंगळुरुवर दणदणीत विजय; सलग पाचव्या पराभवासह आरसीबी आयपीएलमधून बाहेर

अबुधाबी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतिम सामन्यासाठी हैदराबादचा दिल्लीशी सामना

IPL च्या 13 व्या सीजनचा एलिमिनेटर सामना सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) दरम्यान अबुधाबीमध्ये झाला. या सामन्यात हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 गडी राखून पराभूत केले. या पराभवासह बंगळुरू आयपीएलमधून बाहेर गेली आहे. तर, हैदराबादचा आता 8 नोव्हेंबरला दिल्ली कॅपिटल्सशी क्वालिफायर-2 मध्ये सामना होईल. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

अबुधाबीमध्ये प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने हैदराबादला 132 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात हैदराबादने 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 132 धावा काढून सामना आपल्या खिशात घातला. हैदराबादकडून केन विलियम्सनने 50 रनांची नाबाद खेळी केली. तर, बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने 2, एडम जम्पा आणि युजवेंद्र चहलने एक-एक विकेट घेतल्या.

आरसीबीकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक 56 धावांच्या खेळीसह आयपीएलमधील 38वे अर्धशतक केले. त्या पाठोपाठ एरॉन फिंचने 32 रन काढले. तर, हैदराबादकडून जेसन होल्डरने 3, टी नटराजनने 2 आणि शाहबाज नदीमने एक विकेट घेतली.

कोहली-पडिक्कल लवकर आउट

बंगळुरुची खराब सुरुवात झाली. या सीजनमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग करण्यासाठी मैदानात उतरलेला विराट कोहली फक्त 6 रनांवर जेसन होल्डरच्या बॉलवर विकेटकीपरकडे झेलबाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कलदेखील एक धाव काढून होल्डरच्या बॉलवर आउट झाला.

बंगळुरुमध्ये 4 आणि हैदराबादमध्ये एक बदल

बंगळुरुमध्ये जोश फिलिप, क्रिस मॉरिस, इसुरु उडाना आणि शाहबाज अहमदला संघात जागा देण्यात आली नाही. त्यांच्या जागी एरॉन फिंच, एडम जम्पा, मोइन अली आणि नवदीप सैनीला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली आहे. तर, हैदराबादमध्ये ऋद्धिमान साहाच्या जागी श्रीवत्स गोस्वामीला घेतले आहे.

दोन्ही संघ

बंगळुरू: एरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), मोइन अली, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, नवदीप सैनी, एडम जम्पा, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), श्रीवत्स गोस्वामी (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा आणि टी नटराजन.

विजयी संघाचा दिल्लीशी सामना

या सामन्यातील विजयी संघाला अंतिम सामन्यात जाण्यासाठी 8 नोव्हेंबरला अबुधाबीमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी क्वालिफायर-2 मध्ये सामना करावा लागेल. दिल्लीचा मुंबई इंडियंसने पहिल्या क्वालिफायरमध्ये 57 धावांनी पराभव केला.