आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:पाकिस्तान सोडून इतर 120 देशांमध्ये होईल लाइव्ह टेलीकास्ट, हिंदी-इंग्रजीसह 6 स्थानिक भाषेत असेल कॉमेंट्री

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉटस्टारवर सामन्यांची लाइव्ह स्ट्रीमिंग होईल, भारतात स्टार इंडियाकडे टुर्नामेंट प्रसारण अधिकार आहेत

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलचे 13वे सीजन दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. टुर्नामेंटचे लाइव्ह टेलीकास्ट 120 देशांमध्ये केले जात आहे. भारतात स्टार इंडियाकडे टुर्नामेंटच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. भारतात हिंदी आणि इंग्रजीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड़, बांग्ला, मल्याळम आणि मराठी भाषेत कॉमेंट्री असेल.

टीव्हीवरील चॅनेलसोबतच प्रेक्षकांना हॉटस्टारवर मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. परंतू, यासाठी यूजर्सला प्रीमियम मेंबरशिप घेणे गरजेचे असेल. यूके-आयरलँडमध्ये स्काय स्पोर्ट्स, अमेरिका-कॅनडामध्ये विलो टीव्ही तर ऑस्ट्रेलिया-न्यूजीलँडमध्ये फॉक्स स्पोर्ट्सवर मॅच पाहता येतील. दरम्यान, पाकिस्तानमध्ये टुर्नामेंटचे लाइव्ह प्रसारण होणार नाही. याशिवाय अफगानिस्तान आणि बांग्लादेशमधील प्रसारणासाठी स्टार स्थानीक ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा करत आहे.