आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीसीसीआय महिला आयपीएलचे सामने देखील यूएईमध्ये होतील. महिला टीम संघांचे सामने शारजाहमध्ये खेळवले जाऊ शकतील, कारण येथे पुरुष संघांचे सामने सर्वात कमी १२ हाेणार आहेत. १ ते १० नाेव्हेंबरदरम्यान महिला आयपीएलमध्ये ३ संघांदरम्यान ४ सामने खेळवले जातील. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने गव्हर्निंग काैन्सिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत शारजाह स्टेडियममधील तयारीचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. भारतीय महिला संघाने मार्चनंतर एकही सामना खेळला नाही. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, खेळाडूंनी जवळपास ६ महिन्यांपासून एकही सामना खेळला नाही. अशात त्यांना फिटनेस मिळवण्यास वेळ लागेल. काही खेळाडू वैयक्तिक तयारी करत आहेत.
१४ दिवसांनंतर ऋतुराज पॉझिटिव्ह; सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही
चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाड १४ दिवसांनंतर देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो आता सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. नियमानुसार, दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूला संंघात स्थान मिळते. सुरेश रैना बाहेर गेल्यानंतर ऋतुराज तिसऱ्या स्थानावर खेळण्याची शक्यता होती. आता या नंबरवर अंबाती रायडूला संधी मिळू शकते. टीमला १९ सप्टेंबरला सलामी सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडेल. यापूर्वी वेगवान गोलंदाज दीपक चाहर निगेटिव्ह आल्यानंतर गेल्या आठवड्यात संघासोबत जोडला गेला. यादरम्यान मुंबई इंडियन्ससोबत शिबिरात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा नेट गोलंदाजाच्या टीममध्ये समावेश केला आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची क्वारंटाइन कमी करण्याची मागणी
दुबई | ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे यूएईमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचा क्वारंटाइन काळ ६ ऐवजी ३ दिवसांचा करावा, अशी मागणी केली. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या २१ खेळाडूंचा समावेश आहे. सर्व खेळाडू १७ सप्टेंबर रोजी मँचेस्टरवरून यूएईसाठी रवाना होतील. ते २३ सप्टेंबरपासून आपापल्या संघासोबत जोडले जाऊ शकतात.
बेन स्टोक्सच्या सहभागावर शंका, राजस्थान रॉयल्सला माहिती नाही
राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सच्या सहभागावर संशय आहे. स्टोक्सचे वडील कर्करोगाने ग्रस्त आहेत, त्यामुळे तो कुटुंबासोबत न्यूझीलंडमध्ये आहे. गत महिन्यात पाकिस्तान विरुद्ध मालिकेमधूनच स्टोक्स न्यूझीलंडला रवाना झाला होता. आता तो आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. राजस्थानला देखील तो खेळेल किंवा नाही, हे अद्याप माहिती नसल्याचे. संघाचे प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी म्हटले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.