आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबादच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात सर्वांचे लक्ष लेग स्पिनर राशिद खानवर होते. त्याने ३ बळी घेऊन हैदराबादला पहिला विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यात आणखी एका गोलंदाज टी- नटराजनने सर्वांना प्रभावित केले. त्याला केवळ एक विकेट मिळाली.
सामन्यात मार्गदर्शक “जेपी नट्टू’ नावाची जर्सी घातली :
सेलमपासून ३५ किमी दूर चिनप्पामपट्टी गावातील नटराजनचे वडील थंगारासू साडीच्या कंपनीत काम करतात व आई रस्त्याच्या बाजूला दुकान लावत होती. नटराजनला क्रिकेटशी जोडण्यात ए. जयप्रकाश यांचा हात आहे. त्यांनी क्रिकेटमध्ये पुढे जाण्याचा सल्ला दिला. आपल्या मार्गदर्शकांचे आभार मानण्यासाठी नटराजनने दिल्ली विरुद्ध सामन्यादरम्यान “जेपी नट्टू’ नावाची जर्सी घातली होती. २० व्या वर्षापर्यंत तो केवळ टेनिस बॉल क्रिकेट खेळले.
टीपीएलमध्येही टाकले होते सहा यॉर्कर
नटराजनने अचूक यॉर्कर टाकून प्रभावित करण्याची ही पहिली वेळ नव्हती. २०१६ च्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल ड्रॅगन्स आणि अलबर्ट पॅट्रियॉट्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरदरम्यान ६ चेंडू यॉर्कर टाकत आपली क्षमता दाखवून दिली होती. २०१७ च्या आयपीएल लिलावादरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ३ कोटी रुपयांत खरेदी केले होते. तेव्हा तो सर्वात महागडा न खेळणारा खेळाडू होता. त्या सत्रात नटराजनने पंजाबसाठी ६ सामने खेळले. त्यानंतर हैदराबादचे प्रशिक्षक मुरलीधरनने नटराजनवर विश्वास दाखवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.