आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2020
  • Young Varun, An Architect From SRM University, Chennai, Throws Seven Types Of Balls; Varun Chakravarti Is The First Bowler To Take Five Wickets This Ipl Season

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुणवंत नवा चेहरा:चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून आर्किटेक्चर बनलेला युवा वरुण सात प्रकारचे चेंडू टाकतो; 29 वर्षीय वरुण यंदाच्या सत्रात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 व्या वर्षी मैदानावर, 17 व्या वर्षापर्यंत यष्टिरक्षक फलंदाज

कोलकाता नाइट रायडर्सने शनिवारला दिल्ली कॅपिटल्सला ५९ धावांनी हरवले. त्यांच्या सामन्यात कोलकाताचा लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने २० धावा देत ५ बळी घेतले होते. तो यंदाच्या सत्रात ५ बळी घेणारा एकमेव गोलंदाज बनला. २९ वर्षीय वरुणने म्हटले की, “मला सांगितले होते की, छोट्या बाजूने गोलंदाजी करायची आहे, मला चेंडू विकेट टू विकेट करणे आवश्यक होते. मी आई मलिनी व वडील विनाेद चक्रवर्ती आणि प्रेयसी नेहाचे आभार मानतो.’ वरुणने चालू सत्रातील १० सामन्यांत ७.०५ च्या इकॉनॉमीने १२ बळी घेतले आहेत. कर्नाटकचा वरुण आर्किटेक्ट देखील आहे. आयपीएलमध्ये त्याचा प्रवेश चमत्कारिक गोलंदाज म्हणून झाला.

२०१८ मध्ये टीएनपीएलमध्ये संधी मिळाली, किंग्ज इलेव्हन पंजाबने ८.४ कोटी रुपयांत खरेदी केले : वरुणने २०१८ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (टीएनपीएल) पदार्पण केले. यादरम्यान चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइटरायडर्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली. त्याच वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये ९ सामन्यात २२ बळी घेतले. वर्ष २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने ८.४ कोटी रुपयांत खरेदी केले, तेव्हा त्याची मूळ रक्कम २० लाख रुपये होती. मात्र, वरुणला अधिक खेळण्याची संधी मिळाली नाही. आता २०२० साठी गत डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात वरुणला कोलकाताने ४ कोटींत खरेदी केले होते. वरुणने कोलकाता संघात येण्यापूर्वी दिनेश कार्तिककडून यष्टिरक्षणासाठी मार्गदर्शन घेतले आहे. आताची त्याची कामगिरी लक्षवेधी आहे.

१३ व्या वर्षी मैदानावर, १७ व्या वर्षापर्यंत यष्टिरक्षक फलंदाज

वरुणने १३ व्या वर्षी क्रिकेट खेळणे सुरू केले. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत यष्टिरक्षक फलंदाज होता. त्याला अनेक वेळा चाचणीत माघारी फिरावे लागले. त्यामुळे त्याने क्रिकेट सोडून आर्किटेक्ट बनण्याचा निर्णय घेतला. त्याने चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून पाच वर्षांचा आर्किटेक्चर अभ्यासक्रम पूर्ण केला. तो फ्री-लान्स आर्किटेक्टचे काम करू लागला. मात्र, छंद जोपासण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. जो एका क्रिकेट क्लबशी जोडला गेला. मात्र, दुसऱ्याच सामन्यात तो जखमी झाला आणि त्यानंतर वरुण गोलंदाज अष्टपैलूत फिरकीपटू बनावे लागले. दुखापतीनंतर पुनरागमन केले आणि २०१७-१८ मध्ये चेन्नईच्या जुबली क्रिकेट क्लबकडून ७ सामन्यात ३१ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...