आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमिन्सच्या तडाखेबंद खेळीचा VIDEO:एका षटकात कुटल्या 35 धावा, IPLच्या सर्वात वेगवान फिफ्टीची बरोबरी; 56 पैकी 52 धावा चौकार-षटकारांच्याच

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी आयपीएलमध्ये कोलकाता आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात पॅट कमिन्सने धमाकेदार खेळी केली. त्याने अवघ्या 15 चेंडूत 56 धावा केल्या.16 व्या षटकात त्याने 35 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 373.33 इतका होता. कमिसने या सामन्यात 4 चौकार आणि 6 षटकार मारले. तसेच त्याच्या 59 धावांच्या खेळात चौकार आणि षटकारांसह 52 धावा होत्या

कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह या ऑस्ट्रेलियन खेळाडूने केएल राहुलच्या 4 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. राहुल 2018 च्या आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळला आणि त्याने दिल्लीविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. दरम्यान कमिन्सनेही मुंबईविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकले. मुंबईसाठी डॅनियल सॅम्स मॅचचे 16 वे ओव्हर करायला आला होता. मात्र, या षटकात कमिन्सने 35 धावा केल्या. कमिन्सने षटकात 35 धावा कशा केल्या हे आम्हा तुम्हाला सांगतो.

15.1: गोंलदाच सॅम्सचा पहिलाच चेंडू कमिन्सने सामीपार केला.

15.2: सॅम्सच्या दुस-या चेंडूवर कमिन्सला फुल टॉस टाकला, त्यावर कमिसने चौकार मारला

15.3: कमिन्सने तिसऱ्या चेंडूवर मिड-विकेटवर षटकार मारला.

15.4: चौथा चेंडू देखील कमिन्सने षटकारासाठी फाइन लेगवर पाठवला. पुढच्या चेंडूवर सॅम्सने नो बॉल टाकला आणि या चेंडूवर दोन धावा केल्या.

15.5: कमिन्सला फ्री हिट मिळाला आणि त्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने शानदार चौकार मारून त्याचे अर्धशतक पुर्ण केले.

15.6: कमिन्सने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि सामना संपवला. या विजयासह कोलकाताचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...