आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे IPL स्थगित:आयपीएलचे 11 पैकी 8 इंग्लिश क्रिकेटर मायदेशी पोहोचले, खेळाडूंना वेतन मिळणार

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूझीलंडचे खेळाडू १० मेपर्यंत भारतात राहणार

आयपीएल खेळत असलेल्या ११ पैकी ८ इंग्लिश क्रिकेटपटू मायदेशी पोहोचले. आता ते १० दिवस क्वाॅरंटाइन राहतील. आयपीएल मंगळवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. इंग्लंडला पोहोचलेल्या खेळाडूंमध्ये जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम करेन, टाॅम करेन, सॅम बिलिंग्ज, क्रिस वोक्स, मोईन अली व जेसन रॉय आहेत. दुसरीकडे, इंग्लिश कर्णधार इयान मॉर्गन, डेव्हिड मलान व ख्रिस जॉर्डन पुढील ४८ तासांत पोहोचतील.

त्याचबरोबर, केन विल्यम्सनसह आयपीएल खेळत असलेले न्यूझीलंडचे खेळाडू १० मेपर्यंत भारतात राहतील, त्यानंतर इंग्लंडला रवाना होतील. न्यूझीलंड खेळाडू संघटनेचे प्रमुख हीथ मिल्स म्हणाले की, ‘इंग्लंडमध्ये प्रवासबंदी असल्याने क्रिकेटर ११ मेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी भारतात आणखी काही दिवस थांबणे आव्हानात्मक असेल.’ न्यूझीलंडला इंग्लंडमध्ये २ जूनपासून २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

आयपीएल स्थगित झाल्यानंतरही खेळाडूंना संपूर्ण वेतन देणार : आयपीएल स्थगित झाल्याने बीसीसीआय, ब्रॉडकास्टर, फ्रँचायझी आदींचे नुकसान झाले आहे. मात्र, खेळाडूंना त्यांचे संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. करारानुसार, फ्रँचायझी खेळाडूंना तीन टप्प्यांत वेतन देणार आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन दिले असून उर्वरित दोन वेतनाचे हप्ते स्पर्धा संपल्यावर देण्यात येतील. सर्व खेळाडूंचे वेतन फ्रँचायझीच्या इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत आहे. माहितीनुसार, सर्व खेळाडूंना मिळून एकूण वेतन ४८३ कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...