आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलिकडच्या वर्षांत ब्रॉडकास्टर्सनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रसारित होण्यासाठी स्थानिक भाषेतील समालोचनाचा अवलंब केला आहे. स्पर्धेचे प्रसारण इंग्रजी आणि हिंदीमध्ये अनिवार्य असताना, गेल्या काही वर्षांत बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी अशा भाषांनाही प्रादेशिक क्रिकेट चाहत्यांसाठी समालोचनासाठी आणले आहे. पण या वर्षीच्या सीझनपासून IPL समालोचन भोजपुरीमध्येही थेट प्रक्षेपित होत आहे. त्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता. शुक्रवारी प्रथमच रसिकांनी भोजपुरीत कॉमेंट्रीचा आनंद लुटला. स्थानिक चाहत्यांवर कॉमेंट्रीची जादू चालली आहे. मात्र, ही भोजपुरी कॉमेंट्री प्रत्यक्षात टीव्हीवर पाहताच सोशल मीडियावरून त्यावर मीम्स बनवण्यास सुरुवात झाली. अनेक क्रिएटिव्ह नेटकरी त्यावर विविध प्रकारे व्यक्त होत आहेत.
प्रसिद्ध भोजपुरी स्टार आणि भाजप खासदार रविकिशन यांनीही या क्रिकेट समालोचनाचा आनंद घेतला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, क्रिकेट जिसे भारतवर्ष में एक त्योहार के रूप में मनाया जाता है , उसका आनन्द इस बार दुगुना होने वाला हैं काहे से हम आप लोगन के खातिर पुरा मैच के विवरण भोजपुरी में सुनाए आवत बाटी, बनल रहीं हमरे संगे और आनंद लेई भोजपुरी मिठास में बैट बाल के खेला के|" त्यांच्या या ट्विटला लाखो प्रेक्षकांनी लाइक अनेक कॉमेंट केली आहे.
पाहा सोशलवरील काही प्रतिक्रिया...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.