आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग च्या 16 व्या हंगामात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर MI vs CSK असा सामना रंगणार आहे. मात्र, सध्या मुंबई इंडियन्सचा संघ सततच्या दुखापतीच्या समस्येशी झुंजत आहे. संघातील आणखी एका स्टार खेळाडूच्या दुखापतीच्या बातम्या येत असल्याने संघामधील तणाव वाढला आहे. यासोबतच अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 16 चा 12 वा सामना हाय व्होल्टेज असणार आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचे संघ आमनेसामने असतील. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांसमोरील प्रत्येक स्टार खेळाडूच्या खेळावर सस्पेन्स पाहायला मिळत आहे. बेन स्टोक्स टाचदुखीमुळे काही दिवस मैदानाबाहेर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यातच आता जोफ्रा आर्चरच्या खेळावरही सस्पेन्स दिसत आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि झाय रिचर्डसन आधीच संघाबाहेर असताना मुंबई इंडियन्ससाठी ही अडचण वाढवणारी बातमी आहे. वास्तविक राइली मेरेडिथ पुन्हा संघात सामील झाला आहे. अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचे फ्रँचायझी सोबतचे हे तिसरे सत्र आहे. मात्र, तो सतत बेंचवर वेळ घालवतो. गेल्या दोन सीझनमध्ये त्याला डेब्यू मिळेल अशी अनेकदा चर्चाही झाली होती. गेल्या मोसमात मुंबईचा संघ दुखापतीमुळे खेळाडूंना वगळत होता. तरीही रोहित शर्माने ज्युनियर तेंडुलकरला संधी दिली नाही. आता जोफ्रा आर्चरही बाद झाला तर अर्जुनला या सामन्यातून संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या देशांतर्गत हंगामात अर्जुनने चमकदार कामगिरी केली आहे. रणजीमध्ये पदार्पण करताना त्याने शतकही केले. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याला खेळू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अर्जुन शुक्रवारी सराव सत्रातही गोलंदाजी करताना दिसला.
जोफ्रा आर्चरला काय झाले?
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत सध्या आर्चर ही एकमेव ताकद आहे. बुमराह आणि रिचर्डसनच्या दुखापतीनंतर जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर आली आहे.
सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी यूट्यूबवर आपला व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये जोफ्रा आर्चरबद्दल अपडेट होते. त्याने सांगितले की, सराव सत्रात आर्चरच्या कोपराला चेंडू लागला आणि त्यानंतर त्याला त्रास होत असल्याचे दिसले. यानंतर त्याच्या खेळावर सस्पेन्स आहे. मात्र, एक दिवस आधी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांनी सर्व खेळाडू निवडीसाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता आर्चर खेळणार की नाही? ते पाहावे लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.