आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर पॅट कमिन्स आणि मालिकावीर उस्मान ख्वाजाच्या सर्वाेत्तम कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने शुक्रवारी मालिका विजय साजरा केला. ऑस्ट्रेलिया टीमने तिसऱ्या कसोटीत यजमान पाकिस्तानला धूळ चारली. ऑस्ट्रेलिया टीमने ११५ धावांनी कसोटी जिंकली. विजयाच्या ३५१ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान टीमने २३५ धावांत गाशा गुंडाळला.
टीमकडून इमाम (७०) आणि कर्णधार बाबर आझमने (५५) अर्धशतकी खेळी केली. टीमचे शेवटचे ७ फलंदाज हे अवघ्या १२४ चेंडूंत स्कोअरमध्ये ५२ धावांची भर घालत पॅव्हेलियनमध्ये परतले. यासह ऑस्ट्रेलिया संघाने तीन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने आपल्या नावे केली. मालिकेतील सुरुवातीचे दाेन्ही कसोटी सामने अनिर्णीत राहिले होते. ख्वाजाची मालिकेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्याने ४९६ धावा काढल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.