आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयम सुटला:विजयाच्या आनंदात लखनऊच्या संघाच्या आवेश खानने हेल्मेट आदळले, आता बीसीसीआयने फटकारले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात लखनऊने RCB चा 1 गडी राखून पराभव केला.   - Divya Marathi
IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात लखनऊने RCB चा 1 गडी राखून पराभव केला.  

IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात लखनऊच्या संघाने RCB चा 1 गडी राखून पराभव केला. हा असा सामना होता, ज्यात चाहत्यांना त्यांचा श्वास रोखून ठेवावा लागला होता. शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजयासाठी 1 धावांची गरज होती. आवेश खान स्ट्राईकर होता. आवेश खान हर्षल पटेलच्या शेवटच्या बॉलवर हिट करू शकला नाही. आणि बॉल यष्टीरक्षक कार्तिककडे गेला. पण कार्तिकलाही बॉल नीट पकडता आला नाही, त्यामुळे रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना एक धाव घेण्याची संधी मिळाली. धाव घेताच आवेशने विजयाचा आनंद साजरा केला. आवेशने हेल्मेट काढून जमिनीवर आपटले, तर बिष्णोई देखील विजयाच्या आनंदात मेदानावर पळत होता. दुसरीकडे, आरसीबीच्या खेळाडूंचा चेहरा उतरला होता.

आवेश खानला फटकारले

या सामन्यानंतर आवेश खानला त्याच्या कृत्याबद्दल फटकारण्यात आले आहे.आवेशच्या कृत्याबाबत आयपीएलच्या वेबसाइटवर लिहिले आहे की, आवेश खानला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आवेशने IPL आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 ची कबुली दिली आहे आणि चूक स्वीकारली आहे. दुसरीकडे स्लो ओव्हर रेटमुळे बेंगळुरूला 12 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

असा झाला सामना

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, निकोलस पूरनच्या 19 चेंडूत 62 धावा आणि मार्कस स्टोइनिसच्या आक्रमक 65 धावांच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने अत्यंत रोमांचक आयपीएल सामन्यात शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका विकेटने पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर दोन गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात पूरन आणि स्टोइनिस यांनी लखनऊच्या संस्मरणीय विजयाचा पाया रचला. पुरणने या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक अवघ्या 15 चेंडूत झळकावले आहे.