आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात फॉर्मात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यंदा आयपीएलच्या प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी बंगळुरू संघ विजयी माेहीम कायम ठेवणार आहे. बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी मुंबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. यातील विजयाने बंगळुरू संघाला प्लेऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवता येणार आहे. यातील पराभवाने बंगळुरू संघ अडचणीत सापडणार आहे. तसेच टीमला टाॅप-४ मधून बाहेर पडावे लागेल. सध्या बंगळुरू संघ १४ गुणांसह गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर आहे. तसेच पंजाब संघाने आठवे स्थान कायम ठेवले आहे.
यंदा बंगळुरू व पंजाब दुसरा सामना होणार आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात पंजाबने बंगळुरूला पराभूत केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा विजयाचा कित्ता गिरवण्याचा पंजाबचा मानस आहे. बंगळुरू संघाने विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आता डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाने शुक्रवारी विजयाचा दावा मजबूत केला आहे. त्याच्याकडून पंजाबविरुद्ध माेठ्या खेळीची आशा आहे. त्याच्या नावे सत्रात १२ सामन्यांत १३२.७६ च्या स्ट्राइक रेटने ३८६ धावा काढल्या आहेत. यासह तो संघाकडून यंदाच्या सत्रातील टाॅप- स्कोअरर ठरलेला आहे. तसेच दिनेश कार्तिकही फॉर्मात आहे. त्याने १२ सामन्यांत २७४ धावा काढल्या अाहेत. मात्र, कोहली सातत्याने अपयशी ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.