आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर अनुज रावत (६६) आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या (४८) झंझावाती फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शनिवारी आयपीएलमध्ये तिसरा विजय साजरा केला. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने लीगमधील आपल्या चौथ्या सामन्यामध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव केला. हैदराबाद संघाने १८.३ षटकांत सात गड्यांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली. यातून मुंबई इंडियन्स संघाचा आपली पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. मुंबईने लीगमध्ये आपला सलग चौथा सामना गमावला.
सूर्यकुमार यादवच्या (६८) नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू टीमसमोर विजयासाठी १५२ धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरामध्ये बंगळुरू संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ९ चेंडू राखून विजयश्री खेचून आणली.
संघाच्या विजयामध्ये कर्णधार फाफ डुप्लेसिस (१६), विराट कोहली (४८) यांच्यापाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल (२ चेंडूंत नाबाद ८ धावा), दिनेश कार्तिकचे (नाबाद ७) मोलाचे योगदान ठरले. मॅक्सवेलने दोन चौकार खेचून बंगळुरू टीमचा रोमहर्षक विजय निश्चित केला. गोलंदाजीत बंगळुरू संघाकडून हसरंगा डिसिल्वा (२/२८) आणि हर्षल पटेलची (२/२३) कामगिरी लक्षवेधी ठरली. तसेच आकाश दीपने एक बळी घेतला. त्यामुळे मुंबई टीमचा मोठ्या धावसंख्येचा प्रयत्न अपुरा ठरला. रोहितने २६, ईशान किशनने २६ आणि ब्रेविसने ८ धावांची खेळी केली. तसेच युवा खेळाडू तिलक वर्मा आणि पोलार्ड हे दोघेही शून्यावर बाद झाले.
दिल्लीसमोर केकेआरचे आव्हान
आयपीएलमधील चौथा डबल हेडर रविवारी रंगणार आहे. ब्रेबॉर्नवर दुपारी कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स संघ समोरासमोर असतील. या सामन्यात कोलकाताला आता दिल्लीविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक साजरी करण्याची माेठी संधी आहे. सायंकाळी वानखेडेवर राजस्थानसमोर लखनऊचे आव्हान असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.