आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL च्‍या चाहत्‍यांसाठी खुशखबर:आता आयपीएलमध्ये 50% चाहत्यांना 6 एप्रिलपासून प्रवेश, चाहत्यांच्या प्रवेश संख्येत वाढ करण्याचा बीसीसीआयचा निर्णय

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या १५ व्या सत्रात आता ५० टक्के चाहत्यांना प्रवेश मिळेल. त्याची सुरुवात ६ एप्रिलपासून होईल. लीगमधील साखळीचे सुरूवातीचे सामने महाराष्ट्रात होत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय.पाटील व पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर २५% प्रेक्षकांची परवानगी दिली होती.

आता राज्य सरकारने २ एप्रिलपासून संपूर्ण राज्यातील कोरोना निर्बंध हटवले आहेत. त्यानंतर चाहत्यांच्या प्रवेश संख्येत वाढ करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...