आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • BCCI's Attempt To Host IPL Before T20 World Cup; Infection Of The Virus In The Biobubble: Ganguly; News And Live Updates

आयपीएल 2021:टी-20 वर्ल्डकपपूर्वी आयपीएल आयोजनाचा बीसीसीआयचा प्रयत्न; बायोबबलमध्ये व्हायरसची बाधा : गांगुली

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उर्वरित 31 सामन्यांचे अायाेजन; इंग्लंड किंवा यूएईची निवड

आयपीएल २०२१ अनिश्चित काळासाठी स्थगित झाली आहे. जैवसुरक्षित वातावरणात खेळाडू कोरोनाबाधित झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, जैवसुरक्षित वातावरणात कोरोना पोहोचला कसा, त्याबाबत सध्या स्पष्टता नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी म्हटले की,‘आम्हाला मिळालेल्या अहवालानुसार जैवसुरक्षित वातावरणाचे कोणी उल्लंघन केले नाही. प्रवास केल्याने हा संसर्ग या सुरक्षित वातावरणात पोहोचल्याचे एक कारण असू शकते.

आम्हाला चौकशीनंतरच मुख्य कारण कळेल. गतवर्षी यूएईमधील आयोजनादरम्यान तिन्ही ठिकाणी अनेक गोष्टींवर बंधने होती. आम्ही विमानाने प्रवास करत नव्हतो. यंदाच्या सत्रात आमच्याकडे सहा वेगवेगळी ठिकाणे होती. आयपीएल यूएईमध्ये आयोजित करण्यावर चर्चा झाली होती. मात्र, फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होता आणि इंग्लंड दौऱ्याचे यशस्वी आयोजन झाले. गत काही आठवड्यांत कोरोनाचा अतिवेगाने प्रसार झाला.’ उर्वरित सामन्यांबाबत गांगुली म्हणाले की, सर्व मंडळांशी चर्चा करून टी-२० विश्वचषकापूर्वी आयपीएलच्या आयोजनासाठी कालावधी मिळवण्याचा प्रयत्न करू.

आयपीएलच्या आयोजनासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा पर्याय :
आयपीएलचे उर्वरित ३१ सामने केव्हा व कुठे आयोजित करायचे, यावर बीसीसीआय खलबते करत आहे. आता भारतात त्याचे आयोजन अशक्य दिसते. यूएई सर्वप्रथम पर्याय आहे. कारण, येथे गत सत्राचे यशस्वी आयोजन झाले आहे. इंग्लंडलादेखील पर्याय म्हणून पाहिले जात आहे. भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातही आयोजन होण्याची शक्यता अाहे.

उर्वरित ३१ सामन्यांचे अायाेजन; इंग्लंड किंवा यूएईची निवड
काेट्यवधींची कमाई करून देणारी अायपीएल अायाेजित करण्याचा प्रयत्न बीसीसीअाय करत अाहे. यासाठी मंडळाचे एक पथक सक्रिय झाले अाहे. यातून बीसीसीअायने सर्वच क्रिकेट मंडळांशी चर्चा केली. उर्वरित ३१ सामने हे अायाेिजत करण्यात येणार अाहेत. यासाठी इंग्लंड किंवा यूएई येथील स्टेडियमची निवड केली जाईल. लीग स्थगितीमुळे बीसीसीअायला २२०० काेटींचे अार्थिक नुकसान सहन करावे लागणार अाहे. सलग दुसऱ्या वर्षी बीसीसीअायच्या कमाईला फटका बसत अाहे.

बातम्या आणखी आहेत...