आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूचा विराट विजय:बंगळुरू संघाचा 16.2 षटकांत 8 गड्यांनी 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई संघावर विजय

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेहली (नाबाद ८२ धावा) आणि सामनावीर कर्णधार फाफ डुप्लेसिसने (७३) आपल्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला रविवारी १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये विराट विजय मिळवून दिला. बंगळुरू संघाने आपल्या घरच्या मैदानावर लीगच्या पहिल्याच सामन्याम‌ध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला धूळ चारली. बंगळुरू संघाने १६.२ षटकांमध्ये ८ गड्यांनी दणदणीत विजय साजरा केला. यासह बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये बंगळुरु संघावर सलग चाैथ्या विजयाची नाेंद केली. तसेच मुंबईचा सलग दहाव्या सत्रात सलामीला पराभव झाला.

राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २२ चेंडू आणि ८ गडी राखून विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयासाठी माजी कर्णधार विराट काेहली आणि कर्णधार डुप्लेसिसने झंझावाती खेळी केली. यातून त्यांनी वैयक्तिक अर्धशतकेही साजरी केली.

सत्रात माेठ्या भागीदारीची सलामी : यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये सलामीवीर काेहली व डुप्लेसिसने दमदार सुरुवात करताना माेठ्या भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी मुंबईच्या सुमार गाेलंदाजीचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. डुप्लेसिसने ४३ चेंडूंमध्ये ५ चाैकार व ६ षटकारांतून ७३ धावा काढल्या. काेहलीने ४९ चेंडूंमध्ये ६ चाैकार व ५ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली.