आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि पाक मध्ये नवे युद्ध:आशिया आणि T-20 वर्ल्ड कपमध्ये वेगाचा बादशाह उमरान आणि बाबर आझम एकमेकांशी भिडणार ?

लेखक: कुमार ऋत्विज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात चकमक होते, तेव्हा सीमेच्या दोन्ही बाजूला खेळाडूंच्या कामगिरीवर सुद्धा नजर ठेवली जाते. भारत-पाकिस्तान सामन्याशी प्रत्येकाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. विजया शिवाय दोन्ही देशातील जनतेला त्यांच्या संघाकडून काहीही अपेक्षा नसते. भले ही तुम्ही नंतर विश्वचषक गमावला तरी चालेल परंतु शेजाऱ्याकडून पराभव कदापि सहन केला जाणार नाही हीच प्रत्येकाची भावना असते.

भारत-पाकिस्तान सर्वप्रथम आशिया चषक आणि नंतर 23 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकासाठी एकमेकांसमोर भिडणार आहेत. सध्या उमरानची IPL मधील दमदार कामगिरी पाहता या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याला टीम इंडियात संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. सचिन तेंडुलकरसमोर शोएब अख्तर आणि विराट कोहली समोर शाहीद आफ्रिदी यांची तुलनात्मक खेळीची वाट पाहणारी जनता यावेळी बाबरसमोर उमरानला पाहण्यासाठी उत्सुक आहे.

आतापर्यंत जवळपास प्रत्येक सामना पाकिस्तानी पेस गोलदांजी विरुद्ध हिंदुस्थानी फलंदाजी यांच्यात पाहायला मिळाले आहे. परंतु यावेळी परिस्थिती मात्र बदललेली दिसेल. जम्मू एक्सप्रेस उमरान मलिक 154/kmph वेगाने गोलंदाजी करत आहे, तर बाबर आझम सध्याच्या खेळविश्वात जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जात आहे. त्यामुळे हे दोन्ही स्पर्धांमध्ये हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच आमनेसामने येऊ शकतात. यानिमित्ताने लोकांच्या हृदयाचे ठोकेही वाढणार हे उघड आहे.

बाबर आझमने 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाविरुद्ध 52 चेंडूत 68 धावा केल्या होत्या.
बाबर आझमने 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाविरुद्ध 52 चेंडूत 68 धावा केल्या होत्या.

वेग आणि टप्पामुळे उमरानला बनला टीम इंडियाचा नंबर वन गोलंदाज

उमरान जवळपास प्रत्येक चेंडू 150/kmph पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. मोठे दिग्गज फलंदाज त्याचा सामना करायला घाबरतात. जॉनी बेअरस्टो सारख्या इंग्लिश फलंदाजाने उमरानला गेल्या वर्षीच नेटमध्ये हळू गोलंदाजी करण्याचे आवाहन केले होते. जम्मू एक्स्प्रेसची भीती फलंदाजांमध्ये कशी पसरली हे सांगण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.

सुरुवातीला वेग होता, पण उमरानच्या चेंडूंची लाईन लेंथ तितकीशी अचूक नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की, क्रॉस सेक्शनल शॉट्स खेळूनही फलंदाज त्यांच्याविरुद्ध धावा काढत होते.

यानंतर उमरानने आपल्या गोलंदाजीत मोठा बदल केला. आता उमरानचे बरेचसे चेंडू विकेटवर असतात. जर धावा काढण्याच्या घाईत फलंदाज चुकला तर त्याचा त्रिफळा उडणार हे निश्चित याआधी भारताने वेगवान गोलंदाज 153/किमी/तास / /या वेगाने विकेट घेताना कोणालाही पाहिले नव्हते. पण आता ते युग बदलताना दिसत आहे.

22 कोटी पाकिस्तानी जनतेचा स्टार खेळाडू बाबर आझम

सुरुवातीला बाबर आझमची तुलना विराट कोहली, जे रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांसारख्या फलंदाजांशी केली गेली तेव्हा लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये फार कमी फलंदाजांनी राज्य केले आहे. अशा परिस्थितीत बाबरने आपल्या बॅटच्या जोरावर जुना इतिहास बदलला आणि आता भारताचा स्पीड स्टार उमरान मलिक हीच बदलाची कहाणी लिहिताना दिसत आहे.

सचिन तेंडुलकरने भारतात जो दर्जा मिळवला, तीच कीर्ती बाबरची पाकिस्तानात आहे. भारतातील सामने पाहण्यासाठी लोक विचारायचे की सचिन खेळतोय ना? जर उत्तर होय असेल तर उर्वरित सगळे काम नंतर करता येतील पण मॅचला पहली पसंती असायची. असेच काही बाबर बाबत पाकिस्तानात घडले आहे. बाबरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो मसल पॉवरने नव्हे तर सुंदर टायमिंगच्या जोरावर क्रिकेटचा सरताज बनला आहे.

उमराणविरुद्ध सरळ फलंदाजीचाच टिकाव

फलंदाज कितीही मोठा असला तरी वेगवान खेळासमोर तो क्षणभर थरथर कापतो. अशा स्थितीत उमराणसमोर बाबर आल्यानंतर त्याच्या मनात देखील शंभर प्रश्न उभे राहतील यात शंका नाही. त्यामुळे उमरानने पहिल्या चेंडूपासूनच त्याचा टप्पा पकडणे आवश्यक असेल. अन्यथा बाबरसारखा फलंदाज गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्याची एकही संधी सोडणार नाही.

ऋतुराज गायकवाड हा देखील उत्तम फलंदाज आहे. उमरानला ज्या प्रकारे त्याने सरळ बॅटने खेळवले, बाबरही तशीच बॅटिंग करू शकतो आणि कदाचित ऋतुराजपेक्षाही चांगली फलंदाजी करु शकतो. अशा परिस्थितीत उमराण बाबरसमोर कोणती रणनीती अवलंबतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

उमरान मलिकने IPL 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने 154 किमी वेगाने चेंडू टाकला होता.
उमरान मलिकने IPL 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने 154 किमी वेगाने चेंडू टाकला होता.

ऋतुराजसमोर उमरानचा प्रत्येक डाव उलटला

आयपीएल 2022 च्या सामन्यात उमरानच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराज पुढे आला आणि त्याने मिडऑफवर त्याला मारले. उमरानने नंतर ऑफ स्टंपच्या बाहेर एक छोटा चेंडू टाकला आणि ऋतुराजने तो कव्हरवर खेळला. पुढचा चेंडू ऑफ-स्टंपवर पूर्ण भरला होता, ऋतुराजने अर्धा डझन धावांसाठी लाँग ऑनवर पाठवले. उमरानला स्लो चेंडू टाकणे जमत नाही, पण ऋतुराजची आक्रमक वृत्ती पाहून त्याला ही युक्ती करावी लागली.

मात्र, ऋतुराज वेगळाच विचार करून मैदानात उतरला होता. त्याने हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेरही पाठवला. पुढच्या षटकात उमरानने IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू 154 किमी/तास वेगाने टाकला. ऋतुराजने एक पाऊल पुढे टाकले आणि लाँग ऑनच्या दिशेने वळवले. त्याने उमराणकडून 13 चेंडूत 33 धावा करत कोणताही धोका न पत्करता आपल्या वेळेची ताकद दाखवून दिली. तसेच पेसशी स्पर्धा कशी करता येईल हे सांगितले. बाबर आझम यात यशस्वी होणार का? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल

बातम्या आणखी आहेत...