आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Breaking Chennai's Winning Streak, Bangalore Won By Six Runs, Bangalore Won By 13 Runs; Fourth Place In The List

IPL 2022:चेन्नईच्या विजयी मोहिमेला ब्रेक लावत बंगळुरूचा विजयी षटकार, बंगळुरू 13 धावांनी विजयी; गुणतालिकेत चौथ्या स्थानी

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर युवा गोलंदाज हर्षल पटेल (३/३५) आणि ग्लेन मॅक्सवेलने (२/२२) सर्वोत्तम खेळीतून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये सहावा विजय मिळवून दिला. याच खेळीतून बंगळुरूने चेन्नईच्या विजयी मोहिमेला ब्रेक लावला. चार पराभवानंतर बंगळुरूने चेन्नईला धूळ चारली. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाने लीगमधील आपल्या ११ व्या सामन्यात गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जवर १३ धावांनी मात केेली.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात चेन्नई संघाला ८ बाद १६० धावांपर्यंत मजल मारता आली. टीमच्या विजयासाठी डेवाेन काॅन्वेने (५६) दिलेली एकाकी अर्धशतकी खेळीची झुंज व्यर्थ ठरली. इतर फलदंाज सपशेल अपयशी ठरल्याने टीमला पराभवाचा सामना करावा लागला. या सहाव्या विजयासह बंगळुरू टीमने गुणतालिकेत चौथ्या स्थानी धडक मारली. चेन्नईला सातव्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. बंगळुरूने सलगच्या तीन पराभवानंतर विजय मिळवला.

धोनीसह टीमही ठरली सपशेल अपयशी गतचॅम्पियन चेन्नई संघ आणि कर्णधार धोनीही पुण्याच्या एमसीए मैदानावर सपशेल अपयशी ठरले. धोनीचा हा करिअरमधील २०० वा सामना होता. मात्र, त्याला आपल्या या द्विशतकी सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. ताे २ धावांवर बाद झाला.

धावफलक, नाणेफेक चेन्नई (गोलंदाजी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धावा चेंडू ४ ६ विराट कोहली त्रि.गो. मोईन ३० ३३ ०३ १ डुप्लेसिस झे. जडेजा गो. मोईन ३८ २२ ०४ १ ग्लेन मॅक्सवेल धावबाद ०३ ०३ ०० ० महिपाल झे.ऋतुराज गो.थिक्षणा ४२ २७ ०३ २ रजत झे.मुकेश गो. प्रिटाेरियस २१ १५ ०१ १ दिनेश कार्तिक नाबाद २६ १७ ०१ २ डिसिल्वा झे.ऋतुराज गो. थिक्षणा ०० ०१ ०० ० शाहबाज त्रि.गो. थिक्षणा ०१ ०२ ०० ० हर्षल पटेल धावबाद ०० ०० ०० ० मो. सिराज नाबाद ०० ०० ०० ० अवांतर : १२, एकूण : २० षटकांत ८ बाद १७३ धावा. गडी बाद क्रम : १-६२, २-७६, ३-७९, ४-१२३, ५-१५५, ६-१५५, ७-१५७, ८-१७१ गोलंदाजी : मुकेश ३-०-३०-०, सिमरजीत २-०-२१-०, थिक्षणा ४-०-२७-३, जडेजा ४-०-२०-०, मोईन ४-०-२८-२, प्रिटाेरियस ३-०-४२-१. चेन्नई सुपरकिंग्ज धावा चेंडू ४ ६ ऋतुराज झे. प्रभुदेसाई गो. शाहबाज २८ २३ ०३ १ काॅन्वे झे.शाहबाज गो. डििसल्वा ५६ ३७ ०६ २ उथप्पा झे.प्रभुदेसाई गो. मॅक्सवेल ०१ ०३ ०० ० अंबाती रायडू त्रि.गो. मॅक्सवेल १० ०८ ०० १ मोईन झे.सिराज गो. हर्षल ३४ २७ ०२ २ जडेजा झे.कोहली गो. हर्षल ०३ ०५ ०० ० धोनी झे.रजत गो. हेझलवुड ०२ ०३ ०० ० प्रिटाेरियस झे.कोहली गो. हर्षल १३ ०८ ०१ १ सिमरनजीत सिंग नाबाद ०२ ०२ ०० ० महिश थिक्षणा नाबाद ०७ ०४ ०० १ अवांतर : ०४, एकूण : २० षटकांत ८ बाद १६० धावा. गडी बाद क्रम : १-५४, २-५९, ३-७५, ४-१०९, ५-१२२, ६-१३३, ७-१३५, ८-१४९ गोलंदाजी : शाहबाज अहमद ३-०-२७-१, जाेस हेझलवुड ४-०-१९-१, मो. सिराज २-०-२२-०, हसरंगा डिसिल्वा ३-०-३१-१, ग्लेन मॅक्सवेल ४-०-२२-२, हर्षल पटेल ४-०-३५-३. सामनावीर : हर्षल पटेल

बातम्या आणखी आहेत...