आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • CB Vs RR 16th IPL Match LIVE Score Virat Kohli | Mumbai Wankhede Stadium News | Royal Challengers Bangalore Vs Rajasthan Royals Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RCB vs RR:देवदत्त पडिक्कल - काेहलीच्या राॅयल भागीदारीने बंगळुरूचा विजयी चाैकार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा विराट पहिला खेळाडून ठरला आहे

विराट काेहलीच्या कणखर नेतृत्वात यंदाच्या सत्रात आयपीएलचा पहिला किताब जिंकण्याच्या आपल्या माेहिमेकडे आगेकूच करताना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुरुवारी सलग चाैथा विजय साकारला. बंगळुरू संघाने लीगमधील आपल्या चाैथ्या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान राॅयल्सवर मात केली. विराट काेहली (७२) आणि देवदत्त पडिक्कल (१०१) यांच्या अभेद्य शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरू टीमने १६.३ षटकांत १० गड्यांनी सामना जिंकला. यासह बंगळुरू टीमला यंदाच्या सत्रातील सलग विजयाची आपली माेहीम कायम ठेवता आली.

राजस्थान राॅयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १७७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने १० गडी आणि २१ चेंडू राखून सामना जिंकला. काेहली आणि पडिक्कलने संघाच्या विजयासाठी अभेद्य १८१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. ही यंदाच्या सत्रातील सर्वात माेठी भागीदारी नाेंद झाली.

देवदत्त पडिक्कलचे पहिले शतक : बंगळुरू टीमच्या देवदत्त पडिक्कलने आपल्या कर्णधार विराट काेहलीसाेबत राजस्थान संघाविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली. यासह त्याला सत्रातील पहिले शतक साजरे करता आले. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार आणि सहा षटकारांसह नाबाद १०१ धावांची खेळी केली. दुसरीकडे विराट काेहलीने ४७ चेंडूंत नाबाद ७२ धावा काढल्या. यात सहा चाैकार व तीन षटकारांचा समावेश आहे.

अॉफ-बीट
काेहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले. त्याने हसत हसत “मला नाणेफेक जिंकण्याची सवय नाही, हे सारे माझ्यासाठी धक्का देणारेच आहे,’ अशी बाइट त्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...